Maharashtra Cabinate : मंत्रिमंडळात पुरंदर उपसा सिंचन योजनेसाठी 460 कोटींच्या सुधारित खर्चाला मंजुरी

एमपीसी न्यूज : राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत (Maharashtra Cabinate) आज पुरंदर उपसा सिंचन योजनेच्या 460 कोटी 95 लाख रुपयांची पहिली सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. यामुळे पुणे जिल्ह्यातील अवर्षण प्रवण भागातील 63 गावात 25 हजार 498 हेक्टर क्षेत्रात सिंचनाचा लाभ मिळणार आहे.

पुण्यातील पुरंदर, बारामती, दौंड आणि हवेली हे तालुके कमी पर्जन्यछायेच्या प्रदेशात येतात. त्यामुळे या भागातील दुष्काळी परिस्थितीवर कायम स्वरूपी उपाययोजना करण्यासाठी मुळा-मुठा नदीतून उपसा सिंचन योजनेस आज मंत्रिमंडळात मान्यता देण्यात आली आहे.

Community Health Officer Strike : राज्यभरातील समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांचे उद्या कामबंद आंदोलन

तसेच, या योजनेच्या पाण्याचा अपव्यव टाळण्यासाठी बंद पाइप प्रणालीद्वारे वितरण (Maharashtra Cabinate) व्यवस्थेचा पर्याय देखील उपलब्ध करून देण्यात आला आहे.

यावेळी खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर, आमदार शहाजी पाटील, जयकुमार गोरे, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव मनोज सौनिक, जलसंपदा विभागाचे अपर मुख्य सचिव दीपक कपूर, उपमुख्यमंत्री कार्यालयाचे प्रधान सचिव डॉ. श्रीकर परदेशी, ऊर्जा विभागाच्या प्रधान सचिव आभा शुक्ला, नियोजन विभागाचे प्रधान सचिव राजगोपाल देवरा, विधी व न्याय विभागाचे प्रधान सचिव नीरज धोटे, कृष्णा खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक अतुल कपोले आदी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.