Maharashtra Corona Update : राज्यात 13,070 ॲक्टिव्ह कोरोना रुग्ण

एमपीसी न्यूज – महाराष्ट्रात आज (सोमवारी)दिवसभरात 1,080 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली असून, 2,488 कोरोनामुक्तांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. महाराष्ट्रातील ॲक्टिव्ह रुग्णसंख्या घटली असून, सध्या 13,070 ॲक्टिव्ह कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार, राज्यातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 78 लाख 60 हजार 317 एवढी झाली आहे. आजवर 76 लाख 99 हजार 623 जण बरे झाले आहेत. राज्याचा रिकव्हरी रेट वाढून 97.95 टक्के एवढा झाला आहे.

राज्यात आज 47 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आजवर 1 लाख 43 हजार 633 रुग्ण कोरोनामुळे मृत्यूमुखी पडले आहेत. राज्याचा कोरोना मृत्यूदर 1.82 टक्के एवढा आहे.आजवर 7 कोटी 73 लाख 83 हजार 579 प्रयोगशाळा नमुने तपासण्यात आले आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.