Polio Drive : राज्यात 27 फेब्रुवारी रोजी पल्स पोलिओ मोहीम

एमपीसी न्यूज – राज्यातील सर्व जिल्ह्यात येत्या रविवारी, 27 फेब्रुवारी 2022 रोजी राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहीम राबविली जाणार आहे. ही मोहीम यशस्वी करण्यासाठी सर्व विभागांनी योगदान द्यावे, असे आवाहन आरोग्य सेवा आयुक्त डॉ. एन. रामास्वामी यांनी केले.

यंदाच्या वर्षीच्या मोहिमेत एक कोटी पंधरा लाख मुलांना पल्स पोलिओचा डोस देण्याचे नियोजन करण्यात आले आहे, अशी माहिती बैठकीत देण्यात आली.

पल्स पोलिओ लसीकरण मोहीम 27 फेब्रुवारीला राज्यातील सर्व जिल्ह्यात एकाचवेळी राबविण्यात येणार आहे. मोहिमेची पूर्वतयारी करण्यासाठी राज्य कृती दलाची बैठक गोकुळदास तेजपाल रुग्णालयातील मंथन सभागृहात झाली त्यावेळी त्यांनी या सूचना दिल्या.

एक कोटी पंधरा लाखाहून अधिक बालकांना डोस देण्याचे नियोजन

राज्यात पोलिओ मोहिमेअंतर्गत एक कोटी पंधरा लाखाहून अधिक बालकांना डोस देण्याचे नियोजन आहे. राज्यासाठी 1.54 कोटी डोस उपलब्ध झाले आहेत. राज्यात 92 हजार 953 बूथ उभारले जाणार आहेत.

मिशन इंद्रधनुष्य लसीकरण

  • मार्च, एप्रिल आणि मे महिन्यात लसीकरण केले जाणार
  • सात मार्च, चार एप्रिल आणि नऊ मे पासून सलग सात दिवस मोहिम राबविण्यात येणार
  • नऊ जिल्हे आणि दहा महापालिका कार्य क्षेत्रात लसीकरण मोहीम राबविण्यात येणार
  • गर्भवती आणि दोन वर्षांखालील मुलांना लस देणार

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.