Maharashtra Corona Update: राज्यात 5,125 रुग्णांनी केली कोरोनावर मात, 21 टक्के रुग्ण कोरोनामुक्त

Maharashtra Corona Update: 5,125 patients in the state overcome corona, 21 per cent patients are corona free

एमपीसी न्यूज : राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या 24 हजार 427 झाली आहे. आज 1026 नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. राज्यात आज 339 कोरोनाबाधित रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत राज्यभरात 5,125 रुग्ण बरे झाले आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या 2 लाख 21 हजार 645 नमुन्यांपैकी 1 लाख 95 हजार 804 जणांचे प्रयोगशाळा नमुने कोरोना करिता निगेटिव्ह आले आहेत तर 24 हजार 427 जण पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात 2 लाख 81 हजार 655 लोक होम क्वारंटाईनमध्ये असून 15 हजार 627 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

आज राज्यात 53 करोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. एकूण संख्या आता 921 झाली आहे.आज झालेल्या मृत्यूपैकी मुंबई मधील 28, पुण्यात 6, पनवेलमध्ये 6, जळगावमध्ये 5, सोलापूर शहरात 3,  ठाण्यात 2,  रायगडमध्ये, औरंगाबाद शहरात आणि अकोला शहरात प्रत्येकी एक मृत्यू झाला आहे.

आज झालेल्या मृत्यूंपैकी 29 पुरुष तर 24 महिला आहेत. आज झालेल्या 53 मृत्यूपैकी 60 वर्षे किंवा त्यावरील 21 रुग्ण आहेत तर 27 रुग्ण हे वय वर्षे 40 ते 59 या वयोगटातील आहेत. तर 5 जण 40 वर्षांखालील आहे. या 53 रुग्णांपैकी 35 जणांमध्ये ( 66 टक्के)  मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग, अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत.

राज्यातील जिल्हा व मनपानिहाय रुग्णांचा आतापर्यंतचा तपशील: (कंसात मृत्यूची आकडेवारी)

मुंबई महानगरपालिका: 14,924 (556) 

ठाणे:  140 (3)

ठाणे मनपा: 1004 (11)

नवी मुंबई मनपा: 955 (4)

कल्याण डोंबिवली मनपा: 384(3)

उल्हासनगर मनपा: 53

भिवंडी निजामपूर मनपा: 35 (2)

मीरा भाईंदर मनपा: 243 (2)

पालघर: 38 (2)

वसई विरार मनपा: 263 (10)

रायगड: 129 (2)

पनवेल मनपा: 146 (8)

ठाणे मंडळ एकूण: 18,337 (603)

नाशिक: 82

नाशिक मनपा: 43

मालेगाव मनपा:  616 (34)

अहमदनगर: 54 (3)

अहमदनगर मनपा: 10

धुळे: 9 (3)

धुळे मनपा: 54 (3)

जळगाव: 152 (15)

जळगाव मनपा: 40 (9)

नंदूरबार: 22 (2)

नाशिक मंडळ एकूण: 1082 (69)

पुणे: 167 (5)

पुणे मनपा: 2621 (155)

पिंपरी चिंचवड मनपा: 149 (4)

सोलापूर: 9

सोलापूर मनपा: 308 (19)

सातारा: 123 (2)

पुणे मंडळ एकूण: 3377 (185)

कोल्हापूर: 13 (1)

कोल्हापूर मनपा: 6

सांगली: 34

सांगली मिरज कुपवाड मनपा: 4 (1)

सिंधुदुर्ग: 6

रत्नागिरी: 55 (2)

कोल्हापूर मंडळ एकूण: 118 (4)

औरंगाबाद: 94

औरंगाबाद मनपा: 559 (15)

जालना: 16

हिंगोली: 61

परभणी: 1 (1)

परभणी मनपा: 1

औरंगाबाद मंडळ एकूण: 732 (16)

लातूर: 26 (1)

लातूर मनपा: 5

उस्मानाबाद: 4

बीड: 1

नांदेड: 4

नांदेड मनपा: 42 (4)

लातूर मंडळ एकूण: 82 (5)

अकोला: 18 (1)

अकोला मनपा: 151 (11)

अमरावती: 5 (2)

अमरावती मनपा: 84 (11)

यवतमाळ: 98

बुलढाणा: 25 (1)

वाशिम: 2

अकोला मंडळ एकूण: 383 (26)

नागपूर: 2

नागपूर मनपा: 266 (2)

वर्धा: 1 (1)

भंडारा: 1

गोंदिया: 1

चंद्रपूर: 1

चंद्रपूर मनपा: 3

गडचिरोली: 0

नागपूर मंडळ एकूण: 275 (3)

इतर राज्ये: 41 (10)

एकूण:  24 हजार 427 (921)

राज्यातील ज्या भागात रुग्णांचे क्लस्टर सापडले आहेत त्या ठिकाणी केंद्र सरकारच्या मार्गदर्शनानुसार क्लस्टर कंटेन्मेंट कृतियोजना अंमलात आणण्यात येत आहे. राज्यात सध्या 1289 कंटेन्मेंट झोन क्रियाशील असून आज एकूण 12 हजार 923 सर्वेक्षण पथकांनी काम केले असून त्यांनी 54.92 लाख लोकसंख्येचे सर्वेक्षण केलेले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.