Maharashtra Corona Update : राज्यात आज 7,347 नवे रुग्ण; सक्रिय रुग्णांची संख्या दिड लाखांच्या आत

एमपीसी न्यूज – राज्यात आज दिवसभरात 7 हजार 347 नव्या कोरोना रुग्णांची वाढ झाली असून 184 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात नव्यानं वाढ होणा-या रुग्णांची संख्या घटली आहे. बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढली असून राज्यातील सक्रिय रुग्णांची संख्या कमी होत होत आहे. सध्या राज्यातील सक्रिय रुग्णांची संख्या दिड लाखांच्या आत आली आहे.

राज्यातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 16 लाख 32 हजार 544 एवढी झाली आहे. राज्यात सध्या 1 लाख 43 हजार 922 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत. दिलासादायक बाब म्हणजे आतापर्यंत 14 लाख 45 हजार 103 रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. आरोग्य विभागाने याबाबत आकडेवारी जाहीर केली आहे.

राज्यात आज दिवसभरात 184 रुग्णांचा मृत्यू झाला असून कोरोना मृतांची संख्या 43 हजारांच्या पुढे गेली आहे. आतापर्यंत राज्यात 43 हजार 015 रुग्ण कोरोनामुळे दगावले आहेत. राज्यात आज दिवसभरात 13 हजार 247 बरे झालेल्या रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला.

राज्यात नव्यानं वाढ होणा-या रुग्णापेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या अधिक झाली असून रिकव्हरी रेट सध्या 88.52 टक्के एवढा झाला आहे.

राज्यात आजवर तपासण्यात आलेल्या 84 लाख 79 हजार 155 नमुन्यांपैकी 16 लाख 32 हजार 544 नमुने सकारात्मक आले आहेत. राज्यात सध्या 24 लाख 38 हजार 245 जण होम क्वारंटाइन आहेत तर, 13 हजार 545 जण संस्थात्मक क्वारंटाइन आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

_MPC_DIR_MPU_III