Maharashtra Corona Update : राज्यातील कोरोनामुक्तांची संख्या 16.91 लाखांवर

एमपीसी न्यूज – राज्यात आज 6 हजार 290 बरे झालेल्या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला असून राज्यातील कोरोनामुक्तांची संख्या 16.91 लाखांवर पोहचली आहे. आज 4 हजार 930 नव्या रुग्णांची वाढ झाली तर, 95 रुग्णांचा मृत्यू झाला.

आरोग्य विभागाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, राज्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 18 लाख 28 हजार 826 एवढी झाली आहे. त्यापैकी सध्या 89 हजार 098 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत. दिलासादायक बाब म्हणजे आजवर 16 लाख 91 हजार 412 रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत.

आज 95 रुग्णांचा मृत्यू झाला असून आतापर्यंत राज्यात 47 हजार 246 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण चांगले असून तो 92.49 टक्के एवढं आहे. मात्र, राज्यातील मृत्यूदर 2.58 टक्के एवढा आहे.

राज्यात आतापर्यंत 1 कोटी 09 लाख 15 हजार 683 नमूने तपासण्यात आले आहेत त्यापैकी, 18 लाख 28 हजार 826 नमूने सकारात्मक आले आहेत. राज्यात सध्या 5 लाख 38 हजार 084 जण होम क्वारंटाईन आहेत तर, 6 हजार 420 जण संस्थात्मक क्वारंटाईन आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.