Maharashtra Corona Update : राज्यात आज 7 हजार 303 रुग्ण कोरोनामुक्त

एमपीसीन्यूज : राज्यातील कोरोना संसर्गाचे प्रमाण कमी होत असून कोरोनाबाधितांपेक्षा कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या सातत्याने वाढत आहे. आज शनिवारी दिवसभरात 7 हजार 303 रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला.

तर, राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) 89.99 टक्क्यांवर पोहचला आहे. आजपर्यंत राज्यात एकूण 15 लाख 10  हजार 353  कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.

याशिवाय, आज, शनिवारी दिवसभरात राज्यात 5 हजार 548 नवीन कोरोनाबाधित आढळले. तर, 74 रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. सध्या राज्यातील मृत्यू दर 2.62 टक्के एवढा आहे.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 89  लाख 67  हजार 403 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 16 लाख 78 हजार 406 (१८.७२ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आढळले आहेत.

Maharashtra reports 5,548 new #COVID19 cases, 7,303 recoveries and 74 deaths, as per State Public Health Department.

COVID19 tally of the State rises to 16,78,406 including 15,10,353 recoveries and 43,911 deaths. Active cases at 1,23,585. pic.twitter.com/mchTiToSCY

— ANI (@ANI) October 31, 2020

सध्या राज्यात 25  लाख 37  हजार 599 जण गृह विलगीकरणात आहेत. तर, 12  हजार 342 जण संस्थात्मक विलगीकरणात आहेत. आज राज्यातील एकूण ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या 1  लाख 23 हजार 585 आहे. राज्यातील करोनाबाधितांची एकूण संख्या आता 16  लाख 78  हजार 406  वर पोहचली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.