Pune News : महाविकास आघाडीत हिम्मत असेल तर वेगळे लढा ! : चंद्रकांत पाटील

एमपीसी न्यूज : महाविकास आघाडीच्या शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या तीनही पक्षांमध्ये स्वतंत्र लढण्याची हिम्मत नाही. कशाचा कशाला मेळ नाही. झेंडा वेगळा, विचार वेगळा असे असतानाही एकत्र लढण्याची भाषा करत आहेत. हिंम्मत असेल तर वेगळे लढा, मग आमची ताकद दाखवू, असे आव्हान भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिले.

महाविकास आघाडी सरकारमधील तीनही पक्षांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकत्र लढविण्याचे सूतोवाच शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आज पुण्यात केले होते. त्यावर चंद्रकांत पाटील यांनी ही प्रतिक्रिया दिली. राऊत यांनी भाजपवर केलेल्या टिकेलाही त्यांनी प्रत्युत्तर दिले.

यावेळी पाटील म्हणाले, संजय राऊत यांना भाजपवर टीका करण्याची ड्युटी दिलेली आहे. ते त्यांचं उत्तम काम करत आहेत. त्यामुळे त्यांच्या टिकेचा फारसा विचार करण्याची गरज नाही. या तीनही पक्षात हिंम्मत नसल्याने त्यांना एकत्र निवडणूक लढवावी लागत आहे. आमची सगळ्याला तयारी आहे. वेगवेगळे लढले तर भाजप हाच सर्वाधिक मते मिळवणारा पक्ष ठरेल.

हिम्मत असेल तर त्यांनी स्वतंत्रपणे लढावे. सरकार पाच वर्षे चालण्याला आमचा आक्षेप नाही. पण प्रखर विरोधी पक्ष म्हणून तुमची झोप हराम करण्याची आमची तयारी आहे, असल्याचेही त्यांनी ठणकावून सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.