Maharashtra : तुळजाभवानी मंदिरात अशोभनीय वस्त्रधारींना प्रवेश बंद

एमपीसी न्यूज – तुळजाभवानी ही संपूर्ण महाराष्ट्राची कुलस्वामीनी (Maharashtra) मानली जाते. या मंदिरात केवळ महाराष्ट्र नाही तर आसपासच्या राज्यातून देखील भाविक दर्शनासाठी येतात. मात्र, यावेळी येणाऱ्या भाविकांच्या कपड्यावर नाराजी व्यक्त करत श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानाद्वारे मंदिरात यापुढे तोकडे कपडे घालणाऱ्यांना प्रवेश दिला जाणार नाही, असे फलक मंदिर परिसरात लावण्यात आले आहेत.

यामध्ये अंग प्रदर्शक, उत्तेजक, असभ्य व अशोभनीय वस्त्रधारी तसेच हाफ पँट, बर्मुडा परिधान करणाऱ्या नागरिकांना मंदिरात प्रवेश दिला जाणार नाही, असे फलक मंदिर परिसरात लावले आहेत. कृपया भारतीय संस्कृती आणि सभ्यतेचे भान ठेवा, अशी विनंतीही फलकाद्वारे केली आहे.

Pune : जायंट्झ ‘ए’, डिएगो ज्युनियर्स, ग्रीनबॉक्स चेतक यांची आगेकूच

मात्र मंदिर प्रशासनाच्या या निर्णयानंतर नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. यावर आता देशभरातील भविकांकडून प्रतिक्रिया दिल्या जात आहेत. काहींनी मंदिर प्रशासनाच्या या निर्णयाचे स्वागतही (Maharashtra) केले आहे. ऑक्टोबर 2018 मध्ये नवरात्री उत्सवादरम्यान कोल्हापूर महालक्ष्मी मंदिरबाबत असाच निर्णय घेतला होता.

शिर्डीमध्ये अशाप्रकारचे फलक लावले होते. पण लोकांच्या विरोधानंतर हे फलक काढून टाकण्यात आले. या घटना ताज्या असताना आता तुळजाभवानी मंदिर प्रशासनाने असा निर्णय घेतला आहे. तुळजाभवानी मंदिर परिसरात मंदिराच्या महाद्वारापासून गाभाऱ्यापर्यंत विविध ठिकाणी अशाप्रकारचे फलक लावले आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.