Pune : 26/11 दहशतवादी हल्ला नाना पटोलेंनीच केला – देवेंद्र फडणवीस

एमपीसी न्यूज : नाना पटोलेंना तर अवॉर्ड दिला (Pune) पाहिजे. अंबानीच्या घरापुढे स्फोटके मीच (देवेंद्र फडणवीस) ठेवली. आता मला इच्छा झाली आपण एक स्टेटमेंट द्यावं, की 26/11 दहशतवादी हल्ला नाना पटोलेंनीच केला. अशा शब्दात भाजपचे नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसचे पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना टोला लगावला आहे.

पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिरात भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांच्या अध्यक्षतेखाली राज्य कार्यकारिणीच्या बैठकीचे आयोजन केले होते. त्यावेळी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

Maharashtra : तुळजाभवानी मंदिरात अशोभनीय वस्त्रधारींना प्रवेश बंद

यावेळी देवेंद्र फडणवीस म्हणाले की, वाझेला पोलीस दलामध्ये परत कोणी घेतला? हा वाझे पोलीस दलात परत येण्याकरता 2017 मध्ये साली उद्धव ठाकरेंनी माझ्याकडे फाईल पाठवली (Pune) होती. त्यावेळी काही मंत्री सोबत माझ्याकडे आले होते. माझ्यावर दबाव आणला की उद्धव साहेबांनी आग्रह धरला आहे.

काहीही झालं तरी वाझेला पोलीस दलात परत घ्या. पण मी म्हटलं की, वाझेला मी परत घेणार नाही आणि फाईलवर लिहिलं की मी वाझेला परत घेणार नसल्याचे सांगितले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.