Maharashtra Gram Panchayat Elections 2023 : महाराष्ट्रात आज 2 हजार 369 ग्रामपंचायतींत मतदान

एमपीसी न्यूज – राज्यभरातल्या 2 हजार 369 ग्रामपंचायतींसाठी आज (Maharashtra Gram Panchayat Elections 2023) मतदान  होणार आहे. तर 2 हजार 950 सदस्यपदांच्या तर 130 सरपंचांच्या रिक्तपदांच्या पोटनिवडणुकाही होत आहेत. सकाळी साडेसात वाजल्यापासून संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत मतदान होईल. तर मतमोजणी उद्या (दि.6नोव्हेंबर)  होणार आहे.

Maharashtra : ऐन दिवाळीत एसटी वाहतूक ठप्प होण्याची शक्यता; सोमवारपासून एसटी कर्मचारी संपावर

मात्र गडचिरोली आणि गोंदिया या नक्षलग्रस्त भागांतसकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी ते दुपारी 3 वाजेपर्यंतच मतदानाची वेळ असणार आहे. गडचिरोली आणि गोंदिया या नक्षलग्रस्त भागांत 7 नोव्हेंबर 2023 रोजी मतमोजणी होईल.

राज्यात महापालिका निवडणुका रखडल्या आहेत. मात्र आगामी लोकसभा आणि त्यानंतर विधानसभा निवडणुकांच्या निमित्तानं यावेळी जनतेचा कौल कोणाकडे आहे? हे या निवडणुकांतून आजमावता येणार आहे. त्यामुळे या निवडणुकांना विशेष महत्त्व आहे.

कोणत्या जिल्ह्यात ग्रामपंचायतीच्या निवडणुका होणार?

जिल्हे  व ग्रामपंचायतींची संख्या

ठाणे – 61
रायगड –  210
रत्नागिरी – 14
पालघर – 51
धुळे – 31
सिंधुदुर्ग –  24
नाशिक – 48
जळगाव – 168
अहमदनगर – 194
नंदुरबार – 16
पुणे – 231
सोलापूर – 109
सातारा –  133
कोल्हापूर – 89
सांगली – 94
छत्रपती संभाजीनगर – 16
बीड – 186
नांदेड –  25
धाराशिव – 6

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.