Chakan MIDC News : महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची चाकण एमआयडीसीमध्ये बैठक

एमपीसी न्यूज : महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या (Chakan MIDC News) ऑनलाईन पोर्टलद्वारे नोंदणी करताना येणार्‍या अडचणी व त्यावरील मार्गदर्शन त्याचप्रमाणे कचर्‍यापासून सीएनजी गॅस निर्मिती करण्याच्या प्रकल्पाची माहिती देण्यासाठी चाकण एमआयडीसीमध्ये बैठक घेण्यात आली.

फेडरेशन ऑफ चाकण इंडस्ट्रीज तर्फे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या समवेत सदरची बैठक ब्रिजस्टोन कंपनीमध्ये घेण्यात आली. यावेळी फेडरेशन ऑफ चाकण इंडस्ट्रीजचे दिलीप बटवाल, एमपीसीबीचे सदस्य नितीन गोरे, अनेक कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. चाकणमधील औद्योगिक प्रदूषण व इंद्रायणी नदीचे प्रदूषण रोखण्याचे आवाहन करताना मंडळाचे सदस्य नितीन गोरे म्हणाले कि, खरंतर आज मी येथे दोन्ही बाजूने प्रतिनिधि आहे. त्यामुळे माझी जबाबदारी आज येथे जास्त आहे.

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळावर राज्याचा सदस्य म्हणून माझ्या चाकण औद्योगिक वसाहतीच्या समस्या जाणून घेण्यासाठी मी उपस्थित आहे. तर, दुसरीकडे तुमच्यातीलच एक लघुउद्योजक, शेतकरी व स्थानिक परिसरातील नागरी प्रश्न उठवणारा कार्यकर्ता म्हणून सुद्धा मी आज उपस्थित आहे. स्वर्गीय आमदार सुरेशभाऊ गोरे यांनी चाकण ओद्योगीक क्षेत्रात शांतता कायम ठेवण्यासाठी खूप परिश्रम घेतले. त्यामुळेच आज चाकणची ओळख जागतिक पातळीवर आहे.

Chakan : चाकणमधील रस्त्यांची कामे मार्गी लागेनात; भाजपचे आंदोलन

चाकण औद्योगिक क्षेत्रात वायू, जल, प्लॅस्टिक व अन्य सर्व प्रदूषण (Chakan MIDC News) रोज मोठ्या प्रमाणात होते. ज्याचे व्यवस्थापन ही एक मोठी समस्या आहे. वेस्टेज कचर्‍यापासून सीएनजी गॅस निर्मिती करण्याच्या प्रकल्पाचे स्वागत करुन सर्वत्र असे प्रकल्प उभारणीसाठी एकत्रित प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, नितीन गोरे यांची महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळावर सदस्य म्हणून निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.