Chakan : चाकणमधील रस्त्यांची कामे मार्गी लागेनात; भाजपचे आंदोलन

एमपीसी न्यूज : चाकणमधील रस्त्यांची प्रलंबित (Chakan) कामे मार्गी लागावीत आणि तत्काळ खराब झालेले रस्ते दुरुस्त करावेत यासाठी भाजपच्या कार्यकर्त्यांनी चाकण (ता. खेड ) येथील तळेगाव चौकात आंदोलन करून ‘रस्ते दुरुस्त करा अन्यथा खुर्ची रिकामी करा’ असा इशारा प्रशासनाला दिला आहे. यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. आंदोलकांनी काही वेळ चाकण तळेगाव रस्ता रोखण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी आंदोलकांना तातडीने रस्त्यावरून बाजूला घेत वाहतूक सुरळीत केली.

चाकणमधील सततची वाहतूक कोंडी आणि त्यामुळे होणाऱ्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर हे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनास भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष कालिदास वाडेकर, मा.पं.स.सदस्य अमृत शेवकरी, अनिल सोनवणे, मनोज मांजरे, बाळासाहेब नाणेकर, गुलाब खांडेभराड, सुर्यकांत मुंगसे, अजय जगनाडे, प्रीतम शिंदे,संदेश जाधव, दत्ता परदेशी आदींसह कार्यकर्ते मोठ्या संखेने उपस्थित होते.

Pimpri News : सामाजिक दायित्वाची जाणीव ठेवून पत्रकारांनी काम करावे – अशोक वानखेडे

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या प्रकल्प विभागाचे सहायक (Chakan) अभियंता राहुल कदम यांना यावेळी निवेदन देण्यात आले. तातडीने दुरुस्तीची कामे न झाल्यास तीव्र आंदोलनचा इशारा बाळासाहेब नाणेकर यांनी दिला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.