Moshi News : उद्योगमंत्री उदय सामंत यांनी मान्य केल्या पिंपरी चिंचवड उद्योजकांच्या विविध मागण्या

एमपीसी न्यूज : पिंपरी चिंचवड शहरातील (Moshi News) उद्योग क्षेत्रासाठी अग्निशमन केंद्र देऊ, रस्ते व गटारांसाठी पैसे देऊ, कॉमन एफलुएन् ट्रीटमेंट प्लांटसाठी (सीईटीपी) एमआयडीसी पैसे देईन तसेच अनियमित भंगार दुकानांवर कारवाई केली जाणार आहे, अशी माहिती राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी पिंपरी चिंचवड लघु उद्योग संघटनेच्या उद्योजक मेळाव्यामध्ये आज सायंकाळी मोशी येथे दिली.

सामंत हे या उद्योजक मेळाव्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तत्पूर्वी संदीप बेलसरे (अध्यक्ष, पिंपरी चिंचवड लघु उद्योग संघटना) व भोसरी विधान सभेचे आमदार महेश लांडगे यांनी पिंपरी चिंचवड औद्योगिक क्षेत्राच्या व येथील लघु उद्योजकांच्या विविध समस्या मांडल्या व व त्या दूर करण्याचे आवाहन सामंत यांना केले.

त्यानंतर सामंत म्हणाले की, “पिंपरी चिंचवड लघु उद्योग संघटनेला (Moshi News) त्यांच्या कार्यालयासाठी चांगली जागा दिली जाईल. तेथे त्यांनी कार्यालय बांधावे व तेथे कामगारांच्या स्किल डेव्हलोपमेंटसाठी काम करावे. तुम्हाला अग्निशमन केंद्र मिळेल. रस्ते व गटारांसाठी पैसे देऊ. फिल्ट्रेशन(सीईटीपी) प्लांटसाठी छोट्या मोठ्या उद्योगाच्या सीएसआर फंडातून पैसे व महानगरपालिका व एमआयडीसीकडून पैसे घेऊ व बांधू. पण, तो प्लांट तुम्ही – लघु उद्योग संघटनेने चालवावा.”

तसेच सामंत म्हणाले की, “लघु उद्योजकांच्या शास्ती संदर्भातील प्रश्नाविषयी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करू तो सोडवू. अनियमित भंगार दुकानांचा लघु उद्योजकांना होणारा त्रास आपण 100 टक्के दूर करु. मी आत्ताच जिल्हाधिकारी व पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्तांना यावर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत.”

कार्यक्रमास मावळचे खासदार श्रीरंग बारणे, शिरूरचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, आमदार महेश लांडगे, एमआयडीसी व महावितरणचे अधिकारी, पिंपरी चिंचवड लघुउद्योग संघटनेचे अध्यक्ष संदीप बेलसरे, उपाध्यक्ष संजय जगताप, विनोद नाणेकर, संस्थापक अध्यक्ष तात्या सपकाळ, माजी अध्यक्ष सुरेश म्हेत्रे, जयंत कड, अजय भोसले, लघुउद्योजक उपस्थित होते.

उद्योगमंत्री सामंत म्हणाले, छोटा उद्योग हा (Moshi News) मोठ्या उद्योगांचा पाया आहे. त्यामुळे मोठ्या उद्योगांप्रमाणे लहान उद्योगांनाही महत्त्व देण्यात येईल. स्थानिक नागरिकांना उद्योजकांनी रोजगार द्यावेत, यासाठी त्यांच्याशी लवकरच चर्चा करण्यात येईल. पिंपरी चिंचवड लघू उद्योजकांच्या मागण्यांवर लवकरच विविध विभागांच्या प्रमुखांची विस्तृत बैठक घेऊन त्यावर मार्ग काढण्यात येईल. तसेच महावितरणने उद्योगांची वीज वारंवार खंडित करू नये अशा सूचना देण्यात आल्या आहेत. लघु उद्योजकांची सर्व प्रलंबित कामे मार्गी लावण्यासाठी शासन कटिबद्ध असून त्यांना चांगल्या सुविधा देण्याचा शासनाचा प्रयत्न आहे, असे त्यांनी सांगितले.

यावेळी पिंपरी चिंचवड लघुउद्योजक संघटनेकडून मुख्यमंत्री सहायता निधीस 8 लाख 76 हजार 703 रुपयांचा धनादेश उद्योग मंत्री सामंत यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला.

Chakan MIDC News : महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची चाकण एमआयडीसीमध्ये बैठक

आमदार महेश लांडगे म्हणाले, की गेली 2.5 वर्ष कोरोना महामारी काळात लघु उद्योगांना खूप समस्यांचा त्रास सहन करावा लागला आहे. महानगरपालिका महानगरपालिकेला औद्योगिक क्षेत्रातील सर्वात जास्त टॅक्स मिळतो, पण महानगरपालिका येथे काहीच सोयी सुविधा देत नाही. महावितरणचा वीज पुरवठा व अनुमान खंडित होत असल्याने लघुउद्योगांना त्यांच्या ऑर्डर्स वेळेवर पूर्ण करता येत नाही, तसेच त्यामुळे त्यांचे नुकसान होत आहे.

संदीप बेलसरे (अध्यक्ष पिंपरी चिंचवड लघु उद्योग संघटना) यांनी पिंपरी चिंचवड शहरातील लघु उद्योजकांच्या विविध समस्या मांडल्या.

उद्योगमंत्री उदय सामंत पुढच्या बुधवारी मुंबई येथे पिंपरी चिंचवड शहरातील लघु उद्योजकांच्या प्रश्नांच्या संदर्भात महावितरण अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेणार असल्याचे त्यांनी म्हंटले आहे. सामंत यांनी सूचना दिल्या, की थकीत बिलासाठी उद्योजकांचा विद्युत पुरवठा खंडीत करण्यापूर्वी एमआयडीसीला कळवावे. एमआयडीसी अधिकारी लघु उद्योजकांशी चर्चा करून थकीत बिल हप्त्यामध्ये भरण्यासाठीचे स्लॅब तयार करतील.

तसेच, सामंत यांनी उपस्थित असलेल्या महावितरणच्या अधिकाऱ्यांना पुढच्या बुधवारच्या बैठकीत पिंपरी चिंचवड, तळेगाव व चाकण औद्योगिक क्षेत्रासाठी किती सब स्टेशन देणार याविषयीचा आराखडा सादर करण्याचे आदेश दिले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.