Maharashtra : आमदार अपात्रतेप्रकरणी अध्यक्ष राहुल नार्वेकरांच्या कार्यपद्धतीवर सर्वोच्च न्यायालयाचे पुन्हा ताशेरे; दस-याच्या सुट्टीनंतर 30 ऑक्टोबरला होणार पुढील सुनावणी

एमपीसी न्यूज – शिवसेना आमदार अपात्रते प्रकरणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी (Maharashtra) न्यायालयात सादर केलेले वेळापत्रक मान्य नसून त्यांनी नवीन वेळापत्रक 30 ऑक्टोबर पर्यंत सादर करावे. दस-याच्या सुट्टीनंतर 30 ऑक्टोबरला या प्रकरणी पुढील सुनावणी घेण्यात येणार आहे.

तथापि, सुधारित वेळापत्रक सादर न केल्यास न्यायालय यामध्ये हस्तक्षेप करून वेळापत्रक ठरवेल, असे न्यायालायने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांना त्यांच्या कार्यपद्धतीबाबत सुनावले आहे.

Chakan : हॉटेल व्यवसायात भागीदारीचे आमिष दाखवत चौघांची 78 लाख रुपयांची फसवणूक

आमदार अपात्रतेप्रकरणी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या समोर (Maharashtra)आज झालेल्या सुनावणी दरम्यान शिवसेना आमदार अपात्रते प्रकरणी 34 याचिका दाखल झाले आहेत. त्यांचा कायदेशीर व तांत्रिक अभ्यास करण्यासाठी वेळ लागतो आहे.

त्यामुळे सुधारित वेळापत्रक सादर करण्यासाठी आम्हाला अधिक वेळ देण्यात यावा अशी मागणी विधानसभा अध्यक्ष राहील नार्वेकर यांच्या वतीने अॅड . तुषार मेहता यांनी केली. याबाबत शिवसेना ठाकरे गटाचे वकील अॅड. कपिल सिब्बल यांनी आमदार अपात्रते प्रकरणी विधानसभा अध्यक्ष हे दिरंगाई करत असू ते वेळकाढूपणा करत असल्याचा युक्तिवाद केला.

दोन्ही पक्षकारांचे युक्तिवाद ऐकल्यानंतर सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी विधानसभा अध्यक्षांच्या कार्यपद्धतीवर ताशेरे ओढले. 11 मे पासून शिवसेना आमदार अपात्रतेप्रकरणी विधानसभा अध्यक्षांनी कोणतंही पाऊल उचललेलं नाही. तुम्हाला सुधारित वेळापत्रक द्यायला सांगितलं होतं, मात्र तुम्ही सुधारित वेळापत्रक आजपर्यंत सादर केलं नाही.

दसऱ्याच्या सुट्टीत बसून अध्यक्षांनी सुधारित वेळापत्रक तयार करावं, 30 ऑक्टोबर ही अध्यक्षांसाठी वेळापत्रक सादर करण्याची शेवटची संधी असेल, असं त्यांनी सांगितलं. शिवाय, सुधारित वेळापत्रक सदर करताना अध्यक्षांनी प्रसारमाध्यमांशी फार न बोलता वेळापत्रक सादर करावा, अशी तंबी ही कोर्टाने विधानसभा अध्यक्षांना दिली आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.