Tourism week : महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडाळातर्फे पर्यटन सप्ताहाचे आयोजन

एमपीसी न्यूज : महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडाळाच्या प्रधान कार्यालयासमवेत महामंडळ स्वत: परिचलन करत असलेल्या सर्व प्रादेशिक कार्यालये,सर्व पर्यटक निवास, उपहारगृहे, बोट क्लब्स, माहिती केंद्रे, कलाग्राम इ. ठिकाणी 27 सप्टेंबर 2022 रोजीच्या जागतिक पर्यटन दिनाचे औचित्य साधत आपल्या अखत्यारीत येणाऱ्या प्रादेशिक कार्यालय, पर्यटक निवास, उपहारगृहे, बोट क्लब्स, कलाग्राम इ. ठिकाणी सप्टेंबर 23 ते 29 सप्टेंबर 2022 या कालावधीत पर्यटनाशी निगडीत विविध उपक्रमांची अंमलबजावणी करत “पर्यटन सप्ताह” साजरा करण्यात येत आहे.

पर्यटन दिनी विविध पर्यटन पूरक कार्यक्रमाचे आयोजन करून महामंडळ नजीकच्या नामावंत सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक संस्था महाविद्यालये शाळा पुरातत्व विभाग इ. यांसारख्या सर्व समावेशक योगदानातून सदर पर्यटन सप्ताह विविध आकर्षक उपक्रमांची अंमलबजावणी करत उत्स्फुर्तपणे साजरा करण्यात येत आहे.

या निमित्ताने जागतिक पर्यटन दिनाचे बॅनर लावण्यात यावा. सदर घोषवाक्यसहित रचनाबद्ध बॅनर सर्व पर्यटक निवासांमध्ये लावण्यात येणार आहेत. सदर दिनी पर्यटक निवासात वास्तव्यास येणाऱ्या पर्यटकांचे विमानतळ, बस स्थानक, रेल्वे स्टेशन अशा ठिकाणी पुष्पगुच्छ देऊन जागतिक पर्यटन दिनाच्या शुभेच्छा देत स्वागत करण्यात येईल. पर्यटक निवासामध्ये सदर दिवशी येणाऱ्या पर्यटकांसाठी विविध स्पर्धा तसेच पारंपारिक खेळाचे आयोजन असेल.(Tourism week) जागतिक पर्यटन दिनाच्या औचित्य साधत सर्व उपहारगृहामध्ये त्या त्या भागातील स्थानिक प्रसिध्द असलेले विशेष पदार्थ तयार करण्यात येणार असुन त्याबाबत उपहारगृहाच्या प्रवेशद्वारावर पर्यटकांना सूचना फलकाद्वारे अवगत करण्यात येणार आहे.

जागतिक पर्यटन दिनानिमित्त पर्यटकांकरिता अनुभवात्मक पर्यटनाची सांगड घालताना ज्यामध्ये वास्तव्यास आलेले अतिथी पर्यटकांना निवासाभोवताली असलेल्या नजीकच्या सुरक्षित पर्यावरण पूरक ठिकाणी ट्रेक, जंगल ट्रेल नॅचरल वॉक  इ. चा मनमुराद आस्वाद पर्यटकांना देण्यात येणार आहे.

Alandi women molestation : आळंदीत किर्तन एकायला गेलेल्या महिलेचा विनयभंग

‘पर्यटनावर पुनर्विचार’ या विषयावर विविध स्पर्धा तसेच व्याख्यानमाला, कलाकारांच्या कलेतून प्रबोधन इ. आयोजन करण्यात येणार आहे.(Tourism week) ‘पर्यटन सप्ताह हा पर्यटनाशी पुरेपूर निगडित राहील व आपण आयोजित करत असलेल्या उपक्रमांद्वारे पर्यटनवाढ वृद्धिंगत होण्यास राष्ट्रास नक्कीच हातभार लाभेल, या दृष्टीने नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून पर्यटन दिन साजरा करण्यात यावा, अशा सूचना महामंडळाच्या व्यवस्थापकिय संचालक जयश्री भोज यांनी सर्वांना दिल्या आहेत.

व्यवस्थापकिय संचालक यांच्या संकल्पनेनुसार आणि महाव्यवस्थापक श्री. चंदशेखर जयस्वाल यांच्या मार्गदर्शनाखाली पर्यटकांसाठी नवनवीन उपक्रमांची पर्वणीच महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाकडुन सादर करण्यात येत आहे. ऐतिहासिक स्थळी पदयात्रांचे आयोजन, छोटया मॅरथॉन,(Tourism week) गायन व वादनाचे कार्यक्रम, ग्रामीण भागांचे दर्शन, शालेय मुलांसाठी विविध उपक्रम, जबाबदार आणि पर्यावरण पुरक पर्यटनाच्या अंतर्गत जंगल आणि शेती येथे पदभ्रमंती असे उपक्रम राबविण्यात येणार आहेत.

या निमित्ताने पर्यटन राजधानी औरंगाबाद येथे महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ, विनीत फाउंडेशन आणि औरंगाबाद प्लॉग्गर्स यांच्या संयुक्त विदयमाने “मायक्रोप्लास्टिक प्लॉगिंग” या नाविण्यापूर्ण उपक्रमासोबतच सप्टेंबर 27 ला सायक्लोथॉन चे आयोजन करण्यात आले आहे.

पर्यावरणासाठी पुरक असे स्वच्छता अभियान, समुद्रकिनारा सफाई, हस्तकला, गडभ्रमंती असे उपक्रम सर्वत्र राबविण्यात येत आहेत. “Rethinking Tourism” म्हणजेच पर्यटनाचा पुनर्विचार करताना पर्यावरण आणि जबाबदार पर्यटनाची सांगड घालण्यात येणार आहे. पर्यटकांनी या उपक्रमांमध्ये भाग घेवुन पर्यटनाचा आनंद घ्यावा तसेच पर्यावरण रक्षणामध्ये आपला सहभाग नोंदवावा, असे आवाहन महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे प्रादेशिक व्यवस्थापक दिपक हरणे, प्रादेशिक व्यवस्थापक, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ यांनी केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.