Maharashtra : राज्यात ग्रामपंचायत निवडणूकांचे बिगुल वाजले; नोव्हेंबरला होणार मतदान

एमपीसी न्यूज – निवडणूक आयोगाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या (Maharashtra) म्हणजेच ग्रामपंचायत निवडणुकीचे रणशिंग फुंकले असून ग्रामपंचायत व सरपंच निवडणुकीसाठी येत्या 5 नोव्हेंबरला मतदान होणार आहे. त्यासाठी संबंधित ग्रामपंचायतीच्या परिक्षेत्रात आचारसंहिता आजपासून लागू करण्यात आली आहे.

राज्यातील तब्बल 2 हजार 369 ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणूका तर 2 हजार 950 ग्रामपंचायत सदस्य पदाच्या पोटनिवडणूका जाहीर करण्यात आल्या असून यासह सुमारे 130 सरपंच पदांसाठी 5 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे.

Talegaon Dabhade : रोटरी सिटीचे किल्ले सिंहगडावर स्वच्छता अभियान

16 ऑक्टोबर ते 20 ऑक्टोबर या कालावधीत नामनिर्देशनपत्रे दाखल करण्यात येणार आहेत. तसेच 23 ऑक्टोबर रोजी नामनिर्देशनपत्राची छाननी होणार आहे. तर 25 ऑक्टोबर रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत नाम निर्देशनपत्र मागे घेण्याची वेळ ठरविण्यात आली आहे.

त्यानंतर लागलीच निवडणूक चिन्हांचे देखील वाटप करण्यात येणार आहे. 5 नोव्हेंबर रोजी नागरिकांना आपल्या मताचा (Maharashtra) अधिकार बजावता येणार आहे. यासाठी सकाळी 7 ते सायंकाळी 5.30 ही वेळ ठरविण्यात आली आहे.

तसेच 7 नोव्हेंबर रोजी या निवडणुकीची मतमोजणी होणार असल्याची घोषणा, राज्य निवडणूक आयुक्त यु.पी.एस मदन यांनी आज मुंबईत केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.