Talegaon Dabhade : रोटरी सिटीचे किल्ले सिंहगडावर स्वच्छता अभियान

एमपीसी न्यूज – रोटरी क्लब ऑफ तळेगांव दाभाडे सिटी, रोट्रक्ट क्लब (Talegaon Dabhade)ऑफ तळेगांव दाभाडे सिटी व एन. डी. आर. एफ. सुदुंबरे यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंतीच्या निमित्ताने स्वच्छ भारत, सुंदर भारत अभियानांतर्गत किल्ले सिंहगडावर स्वच्छता अभियान राबविण्यात आले. यामध्ये 100 जवान, रोटरी‌ व रोट्रक्टचे 50 सदस्य सहभागी झाले.

 

गडावर सकाळी 9 वाजता पोहोचले.कल्याण‌ दरवाजा, पूर्वेकडील प्रवेशद्वार,(Talegaon Dabhade)नरवीर तानाजी मालुसरे समाधी परिसर,गडववरील सर्व रस्ते इ.ठिकाणी स्वच्छ झाडून घेतले, परिसरातील कचरा एकत्र करून पोत्यात भरण्यात आला, श्रमदान करताना देशभक्ती गीते सादर केली,गडावर आलेले पर्यटक देखील स्वच्छता अभियानात सहभागी झाले.

Pune : पुण्यात भरणार स्मिता मेलिनकेरी यांच्या कलात्मक छायाचित्रांचे एकल प्रदर्शन

संस्थापक अध्यक्ष रो.विलास काळोखे,क्लब ट्रेनर रो.दिलीप पारेख, सेक्रेटरी रो.भगवान शिंदे,रो.संजय मेहता,एन.डी.आर.एफ.चे डेपुटी कमांडंट श्रीमान प्रमोद, सुभेदार मेजर हनुमंत आप्पा, रोट्रक्ट अध्यक्ष हर्षद जव्हेरी, प्रकल्प प्रमुख रो.प्रदीप टेकवडे यांनी गडावरील पर्यटकांना स्वच्छता अभियानाविषयी प्रबोधनपर‌‌ मार्गदर्शन केले व गडावरील सर्वांना गांधी जयंतीच्या शुभेच्छा दिल्या.

सर्व जवान व‌ रोटरी‌ मेंबर्सनी गडावरील रानमेवा पदार्थ,पिठलं, भाकरीचा अविस्मरणीय आस्वाद घेतला. एन.डी.आर.एफचे जवान,रोटरी व रोट्रक्टचे मेंबर यांनी उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी विशेष परिश्रम घेतले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.