Talegaon Dabhade : विद्यार्थी आणि उद्योग यांच्यातील सकारात्मक समन्वयामुळे नूतन महाराष्ट्र अभियांत्रिकी ठरले राज्यात उत्कृष्ट

एमपीसी न्यूज – नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाने (Talegaon Dabhade) विद्यार्थ्यांना रोजगाराभिमुख अभियांत्रिकी शिक्षण स्वीकारण्यासाठी औद्योगिक जगताशी थेट जोडेल. यासाठी संस्थेने अनेक वर्षांपासून सातत्याने विविध संस्थांशी करार केले. कॅम्पस प्लेसमेंटद्वारे सेंट्रल प्लेसमेंट सेलद्वारे नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध करून दिल्या जात आहेत. त्यामुळे नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळ आणि पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या ‘नूतन महाराष्ट्र इन्स्टिटयूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी’ या महाविद्यालयास राष्ट्रीय स्तरावरील सर्वेक्षणात देशातील सर्वोत्कृष्ट स्थान मिळाले आहे.

अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी औदयोगिक अस्थापनांसमवेत काम करणे अपेक्षित आहे जेणेकरून तंत्रज्ञानाची माहिती मिळावी. औदयोगिक आस्थापना आणि शैक्षणिक संस्थांमध्ये समन्वय निर्माण करण्याची गरज लक्षात घेऊन विद्यार्थ्यांना औदयोगिक जगताशी जोडण्याचे काम नूतन महाराष्ट्र अभियांत्रिकीच्या सेंट्रल प्लेसमेंट सेलच्या माध्यमातून केले जात आहे.

नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाने आतापर्यंत औद्योगिक भेटी, संशोधन कार्य, अंतिम वर्षाचे प्रकल्प, नवकल्पना, (Talegaon Dabhade) स्टार्टअप्स, प्लेसमेंट, इंटर्नशिप इत्यादींवर काम करण्यासाठी दीडशेहून अधिक उद्योग समूहांशी सामंज्यस करार केले आहेत.

याचीच नोंद घेऊन ‘डेटाक्विस्ट – सीएमआर टॉप टी- स्कुल एम्प्लॉयबिलिटी इंडेक्स सर्व्हे- 2023’ नुसार, महाराष्ट्रातील नूतन महाराष्ट्र इन्स्टिटयूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी या महाविद्यालयास पश्चिम विभागातील टॉप 10 झोननिहाय संस्थांमध्ये पाचवे, टॉप 100 मध्ये 21 वे स्थान मिळाले आहे. तर खाजगी टी- शाळा आणि रोजगारक्षमता निर्देशांकावर आधारित टॉप 100 टी-स्कुलमध्ये 25 वा क्रमांक प्राप्त झाला आहे.

Talegaon Dabhade : रोटरी सिटीचे किल्ले सिंहगडावर स्वच्छता अभियान

संस्थेचे अध्यक्ष संजय ( बाळा ) भेगडे, उपाध्यक्ष गणेश खांडगे, सचिव संतोष खांडगे, सहसचिव नंदकुमार शेलार, खजिनदार तसेच एनएमआयईटी अभियांत्रिकीचे चेअरमन राजेश म्हस्के, विश्वस्त रामदास काकडे, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई, सेंट्रल प्लेसमेंट सेलचे अधिष्ठाता डॉ. शीतलकुमार रवंदळे, एनएमआयईटी चे प्राचार्य डॉ. विलास देवतारे, शैक्षणिक डीन डॉ. नितीन धवस, एनसीईआरच्या प्राचार्या डॉ. अपर्णा पांडे आदी मान्यवरांनी या यशाबद्दल आनंद व्यक्त केला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.