Maharashtra Corona Update : राज्यात आज 18 कोरोना रुग्णांचा मृत्यू, 1,410 नव्या रुग्णांची नोंद

एमपीसी न्यूज – महाराष्ट्रात कोरोना संसर्गाचा वेग मंदावत आहे. राज्यात आज (रविवारी) 1 हजार 410 नव्या कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली असून, 18 बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

आरोग्य विभागाच्य़ा आकडेवारीनुसार, राज्यातील एकूण कोरोना बाधित रूग्णांची संख्या 66 लाख 02 हजार 961 एवढी झाली आहे. त्यापैकी 64 लाख 35 हजार 439 रूग्ण उपचाराअंती बरे झाले आहेत. आज 1 हजार 520 बरे झालेल्यांना डिस्चार्ज देण्यात आला असून, राज्याचा रिकव्हरी रेट वाढून 97.46 टक्के एवढा झाला आहे.

 

राज्यातील ॲक्टिव्ह कोरोना रुग्ण संख्या 25 हजारांच्या खाली आली असून, सध्या 23 हजार 894 ॲक्टिव्ह कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत. राज्यात आज 18 कोरोना रूग्णांचा मृत्यू झाला असून, आजवर 1 लाख 40 हजार 046 जण कोरोनामुळे दगावले आहेत. राज्याचा कोरोना मृत्यूदर 2.12 टक्के एवढा आहे.

राज्यात आतापर्यंत 6 कोटी 18 लाख 93 हजार 695 नमूने तपासण्यात आले आहेत. सध्या राज्यात 903 जण संस्थात्मक क्वारंटाईन आहेत तर, 1 लाख 91 हजार 401 जण होम क्वारंटाईन आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.