Mahavitran : महावितरणच्या भोसरी विभागामध्ये नवीन भोसरी उपविभाग-2 ची निर्मिती

एमपीसी न्यूज – महावितरणच्या भोसरी विभागातील भोसरी ( Mahavitran ) उपविभाग व आकुर्डी उपविभागाचे विभाजन करून नवीन भोसरी उपविभाग- 2 ची निर्मिती करण्यात आली आहे. महावितरणकडून याबाबतचे मंगळवारी (दि.17) परिपत्रक जारी करण्यात आले. नव्याने तयार झालेल्या भोसरी उपविभाग-2 चे कार्यालय व त्या अंतर्गत तीन शाखा कार्यालयांमध्ये एकूण 69 तांत्रिक व अतांत्रिक पदे मंजूर करण्यात आली आहेत.

पुणे परिमंडळ अंतर्गत भोसरी विभागात यापूर्वी भोसरी, आकुर्डी व प्राधीकरण असे तीन उपविभाग होते. यात भोसरी व आकुर्डी उपविभागाचे विभाजन करून नवीन उपविभाग व त्याअंतर्गत तीन शाखा कार्यालयांची निर्मिती करण्यात यावी यासाठी आमदार महेश लांडगे यांचा पाठपुरावा सुरु होता. जुलै 2023 मध्ये विधानसभेच्या अधिवेशनात लक्षवेधी सूचना मांडली होती. आता भोसरी उपविभाग-2 ची निर्मिती करण्यात आली आहे.

Talegaon Dabhade : आर्थिक व्यवहारातून मानसिक छळ केल्याने तरुणाची आत्महत्या; चौघांवर गुन्हा दाखल

भोसरी विभागाच्या नव्या रचनेत आता भोसरी उपविभाग-1 मध्ये भोसरी गाव, चऱ्होली, नाशिक रोड शाखा आणि नवनिर्मित भोसरी उपविभाग-2 मध्ये इंद्रायणीनगर (नवनिर्मित), मोशी व स्पाईन सिटी (नवनिर्मित) शाखा  तसेच आकुर्डी उपविभागामध्ये चिंचवड, संभाजीनगर व चिखली (नवनिर्मित) शाखा असे प्रत्येकी तीन शाखा कार्यालय राहतील.

नव्या भोसरी उपविभाग-2 कार्यालयामध्ये अतिरिक्त कार्यकारी अभियंता, सहाय्यक अभियंता, कनिष्ठ अभियंता, सहायक लेखापालचे प्रत्येकी एक पद, निम्नस्तर व उच्चस्तर लिपिकांचे 6 पदे तसेच मुख्य तंत्रज्ञ, शिपाईचे प्रत्येकी एक पद असे 12 पदे मंजूर करण्यात आली आहेत.

तसेच नव्या चिखली, इंद्रायणीनगर व स्पाईनसिटी शाखा कार्यालयांमध्ये सहायक अभियंता, प्रधान तंत्रज्ञ, वरिष्ठ तंत्रज्ञ व तंत्रज्ञ, कनिष्ठ कार्यालयीन सहायक असे प्रत्येकी 19 पदे मंजूर करण्यात  ( Mahavitran ) आले आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.