Lonavala : लोणावळा शहर भाजपाच्या अध्यक्षांसह अनेकांनी दिलेले पदांचे राजीनामे

स्विकृत सदस्य बदलावरुन दुफळी

एमपीसी न्यूज – लोणावळा शहर भाजपात स्विकृत नगरसेवक बदलावरुन दुफळी निर्माण झाली असताना पक्षश्रेष्ठीं याकडे गांर्भीयांने पहात नसल्याने लोणावळा शहर भाजपाचे अध्यक्ष बाबा शेट्टी, कोअर कमिटीचे अध्यक्ष सुभाष सोनवणे, कार्ड कमिटी सदस्य अशोक जाधव व गणेश इंगळे, कार्याध्यक्ष उमेश तारे, युवा मोर्चा अध्यक्ष मुकेश परमार, महिला मोर्चा अध्यक्षा अर्पणा बुटाला यांच्यासह विविध आघाड्या, बुथप्रमुख व सक्रिय कार्यकर्ते अशा जवळपास 180 जणांनी पक्षातील पदांचे राजीनामे मावळचे आमदार तथा भाजपाचे जिल्हाध्यक्ष बाळा भेगडे यांच्याकडे दिले असल्याची माहिती शहराध्यक्ष बाबा शेट्टी यांनी पत्रकार परिषदेत दिली.

यावेळी कोअर कमिटी अध्यक्ष सुभाष सोनवणे, भाजपाचे सभागृहातील गटनेते भरत हारपुडे, ज्येष्ठ नेते दादा धुमाळ, माजी नगरसेवक संजय गायकवाड, नगरसेविका गौरी मावकर, सेजल परमार, गणेश इंगळे, मुकेश परमार, अविनाश पवार, उमेश तारे हे उपस्थित होते.

यावेळी बोलताना बाबा शेट्टी म्हणाले 2016 च्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर भाजपातील तिन कार्यकर्त्यांना स्विकृत सदस्य पदावर काम करण्याची संधी व कार्यकाळ आमदार बाळा भेगडे यांनी ठरवून दिला होता. यानुसार बाळासाहेब जाधव यांना प्रथम संधी देण्यात आली. त्यांचा कार्यकाळ 20 जुन 2018 रोजी पुर्ण झालेला असताना देखिल त्यांनी पदाचा राजीनामा दिला नाही. याबाबत वारंवार आमदार व तालुका कोअर कमिटीकडे दाद मागण्यात आली. मात्र आमच्या मागणीचा विचार झाला नाही. विद्यमान स्विकृत सदस्य व पक्षश्रेष्ठी यांची चालढकलपणाची भुमिका पक्षातील सर्वसामान्य कार्यकर्त्यांवर अन्याय करणारी असल्याने याची नैतिक जबाबदारी स्विकारुन मी व माझ्या सहकार्‍यांनी पक्षातील पदांचे राजीनामे दिले आहे. यापुढील काळात आम्ही पक्षांचे सामान्य सदस्य म्हणून काम करणार असल्याचे सांगितले. संजय गायकवाड म्हणाले सदरचा वाद हा पक्षश्रेष्ठींनी तातडीने न मिटविल्यास येणार्‍या लोकसभा व विधानसभा निवडणुकीत याचे परिणाम दिसतील.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.