Pune : मराठा आरक्षण : पुण्यात चौथ्या दिवशीही आंदोलनाची धग कायम 

आमदार माधुरी मिसाळ आणि भीमराव तापकीर यांच्या कार्यलयासमोर ठिय्या

एमपीसी न्यूज – राज्यभरात मराठा आरक्षण प्रश्न चांगलाच पेटला आहे. परळीमध्ये सुरू झालेल्या ठिय्या आंदोलनाने आता राज्यभर आक्रमक रूप धारण केले आहे. अनेक ठिकाणी हिंसेचा आगडोंब उडाला असताना आता या आंदोलनाचा पुढचा टप्पा म्हणजे लोकप्रतिनिधी आणि मंत्र्यांच्या घर, कार्यालयासमोर मराठा आंदोलन ठिय्या देऊन घोषणाबाजी करत आहेत. 

आज चौथ्या दिवशी मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलकांनी खडकवासला विधानसभा मतदार संघाचे आमदार भीमराव तापकीर आणि पर्वती मतदार संघाच्या आमदार माधुरी मिसाळ यांच्या कार्यलयासमोर ठिय्या देत घंटानाद आंदोलन केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.