Maratha Reservation : …तोपर्यंत माझ्यावर अंत्यसंस्कार करू नका; आणखी एका मराठा तरुणाची आत्महत्या

एमपीसी न्यूज : मराठा आरक्षणासाठी हिंगोलीनंतर आता छत्रपती संभाजीनगर ( Maratha Reservation) येथे एका तरुणाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.  गणेश काकासाहेब कुबेर असे आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव आहे. त्याने शाळेतील पाटीवर सुसाईड नोट लिहून ठेवली होती. 

छत्रपती संभाजीनगरच्या आपतगाव येथे राहणाऱ्या या मराठा तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली.  जोपर्यंत आरक्षण भेटत नाही तोपर्यंत माझ्यावर अंत्यसंस्कार करू नका असे त्याने शाळेतील पाटीवर लिहून ठेवले आहे.

Moshi : वेस्ट टू एनर्जी प्रकल्पाद्वारे प्रतिदिन 12 मेगावॅट वीजनिर्मिती

या घटनेनंतर गावकऱ्यांनी आत्महत्या करणाऱ्या तरुणाच्या पत्नीला किंवा मुलांना शासकीय नोकरी देण्याची मागणी केली आहे. याबाबत लेखी आश्वासन मिळेपर्यंत मृतदेह ताब्यात देणार नसून, अंत्यसंस्कार देखील करणार नसल्याची भूमिका गावकऱ्यांनी ( Maratha Reservation) घेतली आहे. तर, पत्नीसह दोन मुलं आणि आई-वडील असे गणेशचे कुटुंब आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.