Marketyard – पेट्रोलपंपावरील कर्मचा-याची पावणेपाच लाखांची बॅग हिसकावून नेणारे जेरबंद

एमपीसी न्यूज – भरदिवसा दुचाकीवरून पेट्रोलपंपावर जमा झालेली रक्कम घेऊन जात असताना पावणे पाच लाखांची रोकड चोरून नेणा-या टोळीस पोलिसांनी अटक केली आहे.ही घटना मंगळवारी (दि.6) दूपारी साडेअकराच्या दरम्यान मार्केटयार्डयेथील
भूराणी कॉलनी जवळ सकाळी साडेअकराच्या सुमारास घडली होती.

गणेश भिमराव पवळे (वय 30, रा. रामटेकडी), सुनिल जीवन भडके (वय 26,रा.रामटेकडी) आणि विजय काशीनाथ पवार (वय 30, रा. हडपसर) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

याप्रकरणी शेख अहम्मद हुसेन (वय 64) यांनी फिर्याद दिली होती.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मॅनेजर शेख अहमद हुसेन आपल्या अॅक्टीव्हा गाडीवर दूपारी साडेअकराच्या दरम्यान गंगाधाम चौकातील पेट्रोल पंपावरून मार्केटयार्ड येथील स्टेट बॅंक मध्ये भरण्यासाठी पावणे पाच रूपयांची रोकड घेऊन जात होते. शेख यांनी ती रोकड अॅक्टीव्हा गाडीच्या पुढील बाजूस बॅग मध्ये ठेवली होती. दरम्यान ते भूरानी कॉलनी येथे आले असता , पाठीमागून त्यांच्याजवळ दोघेजण शाईन गाडीवर आले आणि त्यातील एकाने मॅनेजर शेख यांना तूम्हाला गाडी व्यवस्थित चालवता येत नाही का ? असे बोलून त्या बोलण्यात त्यांना गुंग केले होते. त्याचवेळी बोलता बोलता त्याच्या दुस-या साथीदाराने ती पैशांची बॅग उचलून ते पसार झाले होते.

या गुन्ह्याचा तपास करत असताना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार ,रामटेकडी येथून आज सापळा रचून यातील संशयिताना पोलिसांनी ताब्यात घेतले. पोलिसांनी त्यांची सखोल चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. या गुन्ह्यात आणखी साथीदार सहभागी असून त्यांचा शोध सुरू आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.