Wakad News : माथाडी कामगाराला मारहाण करत दिली धमकी

एमपीसी न्यूज – माथाडी कामगाराला काम करण्यास प्रतिबंध करत मारहाण करत धमकी देणाऱ्यांवर वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Wakad News) हा प्रकार 31 जानेवारी रोजी वाकड येथील फिनीक्स मॉल जवळ घडला आहे.

याप्रकरणी शनिवारी (दि.11) भारत सुनिल काशिद (वय 22 रा. चिंचवडगाव) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून मनोज पवार व त्याच्या साथीदारावर गुन्ह दाखल केला आहे.

  Sonigara Jewellers : एसजेपीएल सोनिगरा ज्वेलर्सची भन्नाट ऑफर,  हिऱ्याच्या खरेदीवर मिळवा हिरा फ्री

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा माथाडी कामगार काम करत असताना आरोपींनी तेथे जाऊन गाडी खाली करायला किती पैसे घेतले अशी विचारणा केली. तेंव्हा कामगार सुरेश कुसाळकर याने आम्हाला पैसे माथाडी कामगार बोर्डातून मिळतात असे सांगितले. (Wakad News) यावेळी आरोपींनी माल उतरण्यास प्रतिबंध करत मारहाण करत जबरदस्ती कामगाराच्या खिशातून 2 हजार रुपये काढून घेत धमकी दिली. यावरून वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.