Maval : निवडणुकीसाठी मावळ मधून 49 बस

एमपीसी न्यूज – लोकसभा निवडणुकीसाठी तळेगाव आगारातून 49 बस दिल्या ( Maval) जाणार आहेत. या बसमधून निवडणूक विभागाचे कर्मचारी, निवडणूक साहित्या मतदान केंद्रांवर वाहतूक करण्याचे काम केले जाणार आहे. मतदान झाल्यानंतर मतमोजणीच्या ठिकाणी या मतपेट्या एसटीने नेल्या जाणार आहेत.

तळेगाव दाभाडे आगाराचे व्यवस्थापक प्रमोद धायतोंडे यांनी याबाबत माहिती दिली. येत्या सोमवारी (दि. 13) मावळ लोकसभेसाठी मतदान होणार आहे. या मतदानासाठी निवडणूक विभागाकडून एसटी आगाराला बसेसची मागणी करण्यात आली आहे. त्यानुसार मावळ तालुक्यातील मतदान प्रक्रियेसाठी तळेगाव आगराकडून 49 बस देण्यात येणार आहेत.

Nigdi : त्रिवेणीनगरमध्ये पाईपालईन फुटली; यमुनानगर परिसरातील पाणीपुरवठा विस्कळीत

तळेगाव दाभाडे आगारातून 25 तर इतर आगराकडून 14 बस मागवून ही संख्या पूर्ण केली जाणार आहे. संपूर्ण मावळ तालुक्यात या बसमधून मतदान साहित्य वाहतूक केले जाणार आहे. रविवार (दि. 12) आणि सोमवार (दि. 13) या दोन दिवशी बस पुरवल्या जाणार असून त्याचे प्रासंगिक कराराच्या दराने एसटीला उत्पन्न मिळणार आहे.

ईव्हीएम, निवडणुकीचे काम करणारे कर्मचारी आणि इतर साहित्य वाहतूक केले जाणार आहे. एखाद्या ठिकाणी बस बंद पडल्यास तिथे तत्काळ पर्यायी बस पुरवण्याचे देखील नियोजन करण्यात आले ( Maval) आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.