Maval: वादळी वाऱ्याने कान्हे फाटा येथील शासकीय ग्रामीण रुग्णालयावरील पत्र्याचे शेड उध्वस्त

Maval: A Iron sheets shed at the Government Rural Hospital at Kanhe Fata was destroyed due to thunderstorm

वडगाव मावळ – कान्हे फाटा येथील शासकीय ग्रामीण रुग्णालयाच्या टेरेस उभारलेले लोखंडी पत्र्याचे शेड आज (रविवार) दुपारी चारच्या सुमारास वादळी वाऱ्याने उडून गेले. शेडचे पत्रे उडून परिसरात पडल्याने रुग्णवाहिकेचेही नुकसान झाले. तसेच परिसरातील झाडांच्या फांद्या मोडून पडल्या.

कान्हे फाटा येथील शासकीय ग्रामीण रुग्णालयाचा छत गळत असल्याने छतावर लोखंडी पत्रे टाकून तीन ते चार महिन्यांपूर्वी ही शेड उभारली होती. ती शेड वादळी वाऱ्यांमुळे पूर्णपणे उध्वस्त झाली. वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसाच्या हलक्या सरी बरसल्या.

या वादळी वाऱ्यामुळे रुग्णालयाचे लोखंडी पत्रे उडून परिसरात पडले. या पत्र्याने झाडांच्या फांद्या तुटून पडल्या. काही पत्रे उंच उडून झाडावर अडकल्याचे पहायला मिळत होते. रुग्णालयाच्या परिसरात वर्दळ अधिक असते. सुदैवाने जीवितहानी झाली नाही, मात्र रुग्णवाहिकेचे नुकसान झाले. अशी माहिती वैद्यकीय अधीक्षक डॉ. गणपत जाधव यांनी दिली.

मावळचे आमदार सुनील शेळके यांनी ग्रामीण रुग्णालयास भेट देऊन वादळामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी केली.

सद्या चालू असलेल्या पावसाने शेतकऱ्यांची धांदल उडाली आहे. तसेच जोरदार पावसामुळे वीजपुरवठा खंडीत झाला असून शेतावरील जनावरांचा चा-यांचा व घराशेजारील गोवऱ्यांचा पावसाच्या पाण्यापासून बचाव करण्यासाठी शेतकऱ्यांची व महिलांवर्गाची मोठी धावपळ सुरु आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.