Maval : सांगवडे गावात पवना नदीत तरुण बुडाला

एमपीसी न्यूज – आज (दि. ११) दुपारी साडेतीन वाजताच्या सुमारास पवना नदीत एका तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना सांगवडे (Maval) येथे घडली.

आर्यन अविनाश भोसले (वय 19, रा. काळेवाडी) असे बुडालेल्या तरुणाचे नाव आहे.

पोलीस उपनिरीक्षक प्रकाश पारखे यांनी दिलेल्या माहितीनुसार,आर्यन हा त्याच्या तीन मित्रांसोबत सांगवडे (Maval) येथे आला होता. चौघेजण दुपारी पवना नदीच्या काठावरून नदीत पोहण्यासाठी उतरले. त्या चौघांपैकी तिघे जण नदीच्या काठाजवळ पोहत होते तर आर्यन हा नदीच्या मध्यभागी पोहण्यासाठी गेला असता  तो पाण्यातील जलपर्णी आणि गाळात अडकला.

Shiroli Khurd : बिबट्याच्या हल्ल्यात लहान मुलीचा मृत्यू

आपला मित्र बुडत असल्याचे पाहून आर्यनच्या मित्रांनी त्याला वाचविण्याचा प्रयत्न केला मात्र मित्रांचे अथक प्रयत्न अयशस्वी ठरले. आर्यन पाण्यात बुडाल्याचे पाहून त्याच्या मित्रांनी डायल 112 (आपत्कालीन प्रतिसाद पथक) ला फोन करून घटनेची सविस्तर माहिती दिली. आपत्कालीन प्रतिसाद पथकाने शिरगाव पोलिसांना ह्या घटनेची माहिती दिली. शिरगाव पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी वन्यजीव रक्षक मावळ संस्थेच्या सदस्यांना मदतीसाठी पाचारण केले.

वन्यजीव रक्षक मावळ संस्था, आपदा मित्र मावळ संस्थेचे निलेश गराडे, विनय सावंत, अनिश गराडे, सार्थक घुले, सर्जेस पाटील यांनी सांगवडे गावाकडे धाव घेवून   पवना नदीतून आर्यनचा मृतदेह बाहेर काढला. ह्या पुढील तपास शिरगाव पोलिस करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.