Chinchwad : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड पोलिसांकडून दारू भट्ट्यांवर छापे

एमपीसी न्यूज – गणेशोत्सवाच्या (Chinchwad) पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड पोलिसांनी शिरगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन तर आळंदी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक कारवाई केली. अवैधरीत्या हातभट्टीची दारू तयार करण्यासाठी लावलेल्या भट्ट्यांवर छापे मारून दारूभट्ट्या पोलिसांनी उध्वस्त केल्या आहेत.

खंडणी विरोधी पथकाने शिरगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत गावठी दारू तयार करण्याच्या भट्टीवर कारवाई केली. जमिनीत खड्डा खोडून त्यात ताडपत्री अंथरून दारू तयार करण्यासाठी गुळ मिश्रित रसायन साठवले होते. याप्रकरणी खंडणी विरोधी पथकाने कारवाई करत दारूभट्टी उध्वस्त केली आहे.

शिरगाव येथे पवना नदीच्या काठावर गुळ मिश्रित रसायन भिजत घातले असल्याची माहिती मिळाल्यानंतर गुन्हे शाखा युनिट पाचने छापा मारून कारवाई केली. त्यात दोन लाख 51 हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी नष्ट केला.

Pune : भविष्यात पुण्यात चांगले मैदान उभे राहिल; विश्वजीत कदम यांचा विश्वास

आळंदी पोलीस ठाण्याच्या हद्दीत कोयाळी गावात लावलेली दारूभट्टी गुन्हे शाखा युनिट तीनने उध्वस्त केली. सुमारे अडीच (Chinchwad) लाख रुपये किमतीचे पाच हजार लिटर कच्चे रसायन पोलिसांनी नष्ट केले आहे. गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाया करण्यासोबतच दारू भट्ट्या देखील पोलिसांनी टार्गेट केल्या आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.