Maval : अनधिकृत होर्डिंग्जवर कारवाई व्हावी – आमदार सुनिल शेळके 

एमपीसी न्यूज – अनधिकृत होर्डिंग्ज उभारणाऱ्यांवर व त्यांना पाठिशी (Maval) घालणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई व्हावी, अशी मागणी मावळचे आमदार सुनिल शेळके यांनी केली आहे.

सोमवारी (दि.17) वाऱ्यासह झालेल्या पावसात देहूरोड-कात्रज बाह्यवळण महामार्गावर रस्त्याच्या बाजुला लावलेले एक होर्डिंग्ज कोसळले.या दुर्दैवी घटनेत चार महिला आणि एका पुरुषाचा मृत्यु झाला असून तिघेजण जखमी झाले आहेत.

Vadgaon Maval : दशकपूर्ती सामुदायिक विवाह सोहळ्यात 11 जोडपी विवाहबद्ध

आमदार शेळके म्हणाले, अनधिकृत होर्डिंग्जमुळे आजपर्यंत अनेक अपघाताच्या घटना घडल्या आहेत. शहरी भागासह ग्रामीण भागात देखील मोठ्या प्रमाणावर असे अनधिकृत होर्डिंग्ज जाहिरात कंपनीकडून उभारले जात आहेत. त्यांच्यावर कारवाई तर व्हावीच, परंतु त्यांना पाठिशी घालणाऱ्या अधिकाऱ्यांवर देखील कारवाई झाली पाहिजे.

आज रावेत परिसरात झालेली घटना अत्यंत दुर्दैवी आहे. या घटनेत निष्पाप नागरिकांचा बळी गेला. अशा घटनांचा गांभीर्यपूर्वक विचार झाला पाहिजे. या अपघातास जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई व्हावी. अपघातात जीव गमावलेल्यांच्या कुटुंबियांना सरकारने तात्काळ आर्थिक मदत जाहीर करावी व जखमींना आवश्यक उपचार मिळावेत यासाठी सहकार्य करावे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.