Maval : मुक्या जीवांना जीवा पल्याड जपणारे आप्पा (व्हिडिओ)

एमपीसी न्यूज- अब्जाधीश, पवार घराणेशाहीला टक्कर देणारा उमेदवार अशा अनेक कारणांमुळे शिवसेना-भाजप महायुतीचे मावळ लोकसभेतील उमेदवार श्रीरंग बारणे चर्चेच्या केंद्रस्थानी आहेत. मूळचे शेतकरी कुटुंबातील बारणे यांचे त्यांच्या घरातील मुक्या जीवांशी असलेला स्नेह सध्या चर्चेचा विषय ठरला आहे.

मूळचे थेरगाव येथील रहिवासी असलेले श्रीरंग चंदू बारणे हे शेतकरी कुटुंबातील आहेत. कुटुंबवत्सल बारणे यांनी नगरसेवक ते खासदार असा राजकीय प्रवास केला. सलग दुसऱ्यांदा ते मावळच्या रिंगणातून आपले नशिब आजमावत आहेत. महापालिकेच्या भ्रष्टाचारावर, देशभरातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर पोटतिटकीने बोलणारे खासदार बारणे गो प्रेमी आहेत. त्यांच्या घरी आजही गाय-वासरु आहे. दोन श्वान आहेत.

आप्पा सध्या प्रचारात व्यस्त असले तरी गाय-वासरांना वेळ देतात. कितीही काम असले तरी थोडा वेळ ते त्यांच्यासाठी राखून ठेवतात. त्यामुळेच आप्पांची चाहूल लागली तरी ही जनावरे त्यांच्याकडे धाव घेतात. जोवर आप्पा त्यांच्या पाठीवरुन मायेने हात फिरवत नाहीत. तोवर गाय-वासरु तेथून हलत नाहीत. आप्पांच्या मागे-पुढे ही गाय वासरे लहान मुलांप्रमाणे बागडतात. आप्पांचे त्यांच्या जनावरांसोबत असलेले घट्ट नाते पाहून सर्वजण आश्चर्याने आवाक्‌ होतात. आप्पा घराबाहेर पडत असताना एखाद्या कुटुंबातील सदस्याप्रमाणे ते त्यांना निरोप द्यायला येतात. हे प्राणी म्हणजे आपल्या कुटुंबातील सदस्य असल्याचे आप्पा सांगतात. त्यांच्याच आशीर्वादामुळे आपण इथवर पोहचल्याचे त्यांनी नमूद केले.

https://www.youtube.com/watch?v=LoTwxT8cDog

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.