Maval : मतदान यंत्रावर राष्ट्रवादीचे पार्थ पवार यांच्यानंतर शिवसेनेचे श्रीरंग बारणे यांचे नाव

एमपीसी न्यूज – मावळ लोकसभा मतदारसंघातील बॅलेट युनिटवर प्रथम क्रमांकावर बहुजन समाज पार्टीचे उमेदवार संजय किसन कानडे यांना स्थान मिळाले आहे. तर, दुस-या क्रमांकावर राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस महाआघाडीचे पार्थ पवार आणि तिस-या क्रमांकावर शिवसेना-भाजप महायुतीचे श्रीरंग बारणे यांचे नाव आहे. प्रमुख विरोधी उमेदवारांची नावे एकाखाली एक आली आहेत.

बॅलेट युनिटवरील अनुक्रमांकही उमेदवारांना प्रचारासाठी महत्त्वाचा मानला जातो. हा क्रमांक ठरविताना मराठी नावातील अद्याक्षराच्या बाराखडीतील अनुक्रमांकानुसार ठरविण्यात येतो. त्यामध्येही राष्ट्रीय आणि प्रादेशिक नोंदणीकृत व आयोगाची मान्यताप्राप्त पक्षांच्या उमेदवारांचे क्रमांक आधी ठरविले जातात. त्यानंतर नोंदणीकृत पक्षांना आणि नंतर अपक्षांना स्थान मिळते. उमेदवाराने अर्ज दाखल करताना ज्या पद्धतीने नाव दिले असेल (उदा. नाव किंवा आडनाव प्रथम) त्यातील पहिल्या अक्षराचा निकष अनुक्रमांक लावण्यासाठी ठरविले जातो.

मावळ लोकसभा मतदारसंघात दोन राष्ट्रीय पक्ष निवडणूक लढवित आहे. बहुजन समाज पार्टी (बसपा) आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन राष्ट्रीय पक्ष आहेत. त्यामुळे दोन्ही पक्षाच्या उमेदवारांची नावे मतदान यंत्रावर अगोदर आहेत. तर, राज्यस्तरीय पक्ष असलेल्या शिवसेनेच्या उमेदवाराचे नाव तिस-या क्रमांकावर आहे.

मतदान यंत्रावर अशी असणार आहेत उमेदवारांची नावे आणि चिन्ह

1)बसपचे उमेदवार संजय किसन कानडे – हत्ती
2)राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस महाआघाडीचे पार्थ अजित पवार – घड्याळ
3)शिवसेना-भाजप महायुतीचे श्रीरंग आप्पा चंदु बारणे – धनुष्यबाण
4)क्रांतीकारी जयहिंद सेनेचे जगदीश उर्फ अय्यप्पा शामराव सोनवणे – हेलीकॉप्टर
5)आंबेडकर राईट्‌स पार्टी ऑफ इंडियाच्या जया संजय पाटील – कोट
6)बहुजन मुक्ती पार्टीचे पंढरीनाथ नामदेव पाटील – खाट
7)भारतीय नवजवान सेनेचे प्रकाश भिवाजी महाडिक – डिश एॅन्टिना
8)भारतीय प्रजा स्वराज्य पक्षाचे मदन शिवाजी पाटील – शिट्टी
9)वंचित बहुजन आघाडीचे राजाराम नारायण पाटील – कप आणि बशी
10)बहुजन रिपल्बिकन सोशलिस्ट पार्टीचे सुनील बबन गायकवाड – एअर कंडिशनर
11)अपक्ष अजय हनुमंत लोंढे – बॅट
12) अमृता अभिजीत आपटे – गॅस सिलेंटर
13)नवनाथ विश्वनाथ दुधाळ – मुसळ आणि खलबत्ता
14)प्रशांत उर्फ बाबाराजे गणपत देशमुख – ऊस शेतकरी
15)बाळकृष्ण धनाजी घरत – हंट
16)राकेश प्रभाकर चव्हाण – सफरचंद
17)राजेंद्र मारुती काटे (पाटील) – नारळाची बाग
18)विजय हनुंमत रंदिल – जहाज
19)सूरज अशोकराव खंडारे – संगणक
20)सुरेश श्रीपती तौर – ट्रॅक्टर चालविणारा शेतकरी
21) डॉ. सोमनाथ उर्फ बाळासाहेब अर्जुन पौळ – स्टेथोस्कोप

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.