Nigdi : पार्थ पवार यांच्या प्रचारार्थ उदयनराजे, शिवेंद्रराजे, रामराजे यांची सभा

एमपीसी न्यूज – मावळ लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार पार्थ पवार यांच्या प्रचारासाठी साता-याचे छत्रपती खासदार उदयनराजे महाराज मैदानात उतरले आहेत. आज (शनिवारी) सायंकाळी निगडीत छत्रपती खासदार उदयनराजे महाराज, छत्रपती आमदार शिवेंद्रराजे महाराज आणि रामराजे नाईक निंबाळकर यांची जाहीर सभा होणार आहे.

मावळ लोकसभा मतदारसंघाचे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शेकाप, स्वाभिमानी शेतकरी संघटना, आरपीआय डेमोक्रॅटिक – कवाडे, गवई, स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष, दलित पँथर व मित्र पक्षाचे अधिकृत उमेदवार पार्थ अजित पवार यांच्या प्रचारार्थ प्राधिकरण येथील नियोजित महापौर निवासाच्या मैदानावार आज सायंकाळी सहा वाजता जाहीर सभा होणार आहे.

छत्रपती खासदार उदयनराजे महाराज भोसले, छत्रपती आमदार शिवेंद्रराजे महाराज भोसले, रामराजे नाईक निंबाळकर, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील, आमदार शशिकांत शिंदे उपस्थित राहणार आहेत. पिंपरी-चिंचवड शहरात सातारा, सांगली परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने वास्तव्यास आहेत. त्यामुळे सातारा, सांगली परिसरातील मतदारांसाठी साता-यातील राष्ट्रवादीच्या नेत्यांची सभा घेण्यात येत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.