Maval Corona Update : मावळात आज 150 नवे रुग्ण, 118 जणांना डिस्चार्ज

15 दिवसात 22  रुग्णांचा कोरोनाने मृत्यू

एमपीसीन्यूज : मावळ तालुक्यात मंगळवारी (दि.27) 150  रुग्णांचा चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला, तर तालुक्यात दिवसभरात 118  जणांना डिस्चार्ज देण्यात आला. मागील 15 दिवसात 22  रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाल्याने आतापर्यंत 276 रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे.

सद्यस्थितीत उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 1444 आहे. आज शहरी भागात 78 तर ग्रामीण भागात 72  नवे रुग्ण सापडले. यामध्ये तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या हद्दीत 58, लोणावळा नगरपरिषदेच्या हद्दीत 13, वडगाव नगरपंचायतीच्या हद्दीत ७ रुग्ण सापडले. तालुक्यातील कोरोनाबाधितांची आतापर्यंतची एकूण संख्या12,673 झाली आहे. तर दिवसभरात 118  रुग्ण बरे झाल्याने घरी सोडण्यात आले.

मंगळवारी आढळलेल्या कोरोना रुग्णांमध्ये ग्रामीण भागात नवलाख उंब्रे 14, वराळे 11, इंदोरी 4, तळेगाव दाभाडे ग्रामीण 4, ओझर्डे 3, साळुंब्रे 3, आंबळे 3, सोमाटणे 3, उर्से 3, भोयरे २, कुसगाव पमा २, कोथुर्णे २, नानोलो तर्फे चाकण २, कुसगाव बुद्रुक २, शिरगाव, थुगाव, गहूंजे, जांबवडे, शिवली, कांब्रे नामा, खांडशी, नेसावे, वेल्हेवळी, साते, कामशेत, भाजे, जांभूळ कान्हे प्रत्येकी 1 असे एकूण 72 रुग्ण सापडले.

10,953 जणांना आतापर्यंत डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत 276 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.तळेगाव नगरपरिषद हद्दीत सर्वाधिक 3975, लोणावळा नगरपरिषद हद्दीत 2499 व वडगाव नगरपंचायत हद्दीत 767 रुग्ण सापडले आहेत.

शहरी भागात 7241 रुग्ण तर ग्रामीण भागात 5432रुग्ण आढळून आले आहेत. 6 रुग्णांची परिस्थिती गंभीर आहे. कोरोना रुग्ण बरे होण्याचा दर 86.43 टक्के आहे तर मृत्यू दर 2.18 टक्के आहे.

सद्यस्थिती तळेगाव दाभाडे नगरपरिषद मध्ये 329, लोणावळा नगरपरिषद मध्ये 342, वडगाव नगरपंचायतमध्ये 66 व ग्रामीण भागात 707 असे एकूण 1444 रुग्ण आहेत, अशी माहिती तहसीलदार मधुसूदन बर्गे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. चंद्रकांत लोहारे व कोविड समन्वयक डॉ. गुणेश बागडे यांनी माहिती दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.