Maval Corona Update : दिवसभरात 214 नवे रुग्ण तर 118 जणांना डिस्चार्ज

एमपीसी न्यूज – मावळ तालुक्यात गुरुवारी (दि. 6) 214 रुग्णांचा चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला, तर तालुक्यात दिवसभरात 118 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. आज शहरी भागात रुग्ण संख्येत वाढ झाली आहे. आज एकही रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला नसुन आतापर्यंत 319 रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला. सद्यस्थितीत उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 1748 आहे.

शहरी भागात 128 तर ग्रामीण भागात 86 रुग्ण आज सापडले.आज तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या हद्दीत 24 रुग्ण सापडले. लोणावळा नगरपरिषदेच्याहद्दीत 98 रुग्ण सापडले. वडगाव नगरपंचायतीच्या हद्दीत 6 रुग्ण सापडले.

तालुक्यातील कोरोनाबाधितांची आतापर्यंतची एकूण संख्या 14961 झाली आहे. तर दिवसभरात 118 रुग्ण बरे झाल्याने घरी सोडण्यात आले.

गुरुवारी आढळलेल्या कोरोना रुग्णांमध्ये ग्रामीण भागात टाकवे बुद्रुक 15, इंदुरी 15, कामशेत 10, कुसगाव बुद्रुक 9, वराळे 7, तळेगाव दाभाडे ग्रामीण 3, आंबी 2, डाहुली 2, डोंगर गाव 2 जांभूळ 2, कुणे नामा 2, कुरवंडे 2, शिरगाव 2, साते, सुदवडी, कुसगाव बुद्रुक, ब्राम्हण वाडी (साते), चिखलसे, दारुंब्रे, कान्हे, केवरे व नवलाख उंब्रे प्रत्येकी 1 एकूण असे 86 रुग्ण सापडले.

12894 जणांना आतापर्यंत डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत 319 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तळेगाव नगरपरिषद हद्दीत सर्वाधिक 5049, लोणावळा नगरपरिषद हद्दीत 2918 व वडगाव नगरपंचायत हद्दीत 829 रुग्ण सापडले आहेत. शहरी भागात 8796 रुग्ण तर ग्रामीण भागात 6165 रुग्ण आढळून आले आहेत.

7 रुग्णांची परिस्थिती गंभीर आहे. कोरोना रुग्ण बरे होण्याचा दर 86.18 टक्के आहे तर मृत्यू दर 2.13 टक्के आहे.

सद्यस्थिती तळेगाव दाभाडे नगरपरिषद मध्ये 522, लोणावळा नगरपरिषद मध्ये 387, वडगाव नगरपंचायत मध्ये 62 व ग्रामीण भागात 777 असे एकूण 1748 रुग्ण आहेत. अशी माहिती तहसीलदार मधुसूदन बर्गे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. चंद्रकांत लोहारे व कोविड समन्वयक डॉ. गुणेश बागडे यांनी माहिती दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.