Maval Corona Update : मावळ तालुक्यात आज कोरोनाचे 43 नवीन रुग्ण; 11 जणांना डिस्चार्ज

आज दिवसभरात तीन रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

एमपीसी न्यूज – मावळ तालुक्यात आज (मंगळवारी, दि. 25) कोरोनाचे 43 नवीन रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे कोरोनाबधितांची एकूण संख्या 1 हजार 774 झाली आहे. तर दिवसभरात 11 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

आज दिवसभरात तीन रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. मृत्यू झालेले रुग्ण तळेगाव (पुरुष, 58 वर्ष), तळेगाव स्टेशन (पुरुष, 26 वर्ष), वडगाव (महिला, 70 वर्ष) येथील आहेत.

आज आढळलेल्या कोरोना रुग्णांमध्ये 19 रुग्ण शहरी भागातील आहेत. तर 24 रुग्ण ग्रामीण भागातील आहेत.

ग्रामीण भागात आढळलेल्या रुग्णांमध्ये कामशेत येथील सहा, कुसगाव बु., सुदुंबरे येथील प्रत्येकी तीन, कुणे नामा, वरसोली येथील प्रत्येकी दोन, कुरवंडे, धामणे, इंदोरी, देवघर, काले, मळवली नामा, वाकसाई, गेव्हंडे खडक येथील प्रत्येकी एक रुग्णाचा समावेश आहे.

तळेगाव शहरात 16, लोणावळा शहरात 1 आणि वडगावमध्ये दोन रुग्णाची नोंद झाली आहे.

एकूण 1 हजार 774 रुग्णांमध्ये सध्या 381 रुग्ण सक्रीय आहेत. तर 1 हजार 321 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. 72 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

तळेगाव नगरपरिषद क्षेत्रात 590, लोणावळा नगरपरिषद 203 आणि वडगाव नगरपंचायत क्षेत्रात 122 रुग्ण सापडले आहेत. तर ग्रामीण भागात 859 रुग्ण आढळून आले आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.