Pune Corona Update : 1123 रुग्ण कोरोनामुक्त, 1204 नवे रुग्ण, 44 जणांचा मृत्यू

सध्या शहरात 796 क्रिटिकल रुग्ण असून, त्यात 483 जण व्हेंटिलेटरवर आहेत.

एमपीसी न्यूज – पुणे शहरात कोरोनाचे संकट आटोक्यात येत असून, मंगळवारी तब्बल 1123 नागरिक कोरोनातून मुक्त झाले. 6 हजार 370 कोरोनाच्या चाचण्या करण्यात आल्या. त्यामध्ये 1204 नवे रुग्ण आढळले. 44 जणांचा मृत्यू झाला.

सध्या शहरात 796 क्रिटिकल रुग्ण असून, त्यात 483 जण व्हेंटिलेटरवर आहेत. कोरोनाचे पुणे शहरात 85 हजार 700 रुग्ण झाले आहेत. 68 हजार 900 रुग्णांनी वेळीच उपचार घेतल्याने कोरोनावर मात केली आहे.

आतापर्यंत या रोगामुळे 2 हजार 77 नागरिकांचा मृत्यू झाला आहे. 14 हजार 723 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत, अशी माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागातर्फे देण्यात आली आहे.

लोहगावमधील 65 वर्षीय पुरुषाचा विनोद हॉस्पिटलमध्ये, चंदननगरमधील 47 वर्षीय पुरुषाचा रुबी हॉल क्लिनिकमध्ये, येरवड्यातील 46 वर्षीय पुरुषाचा, आनंदनगरमधील 33 वर्षीय पुरुषाचा, घोरपडी पेठेतील 65 वर्षीय पुरुषाचा, मुंढव्यातील 67 वर्षीय महिलेचा, कोंढाव्यातील 45 वर्षीय महिलेचा, धनकवडीतील 61 वर्षीय महिलेचा, मुंढव्यातील 55 वर्षीय पुरुषाचा ससून हॉस्पिटलमध्ये कोरोनामुळे मृत्यू झाला.

भारती विद्यापीठमधील 60 वर्षीय पुरुषाचा बुधराणी हॉस्पिटलमध्ये, कर्वेरोडवरील 61 वर्षीय पुरुषाचा ससून हॉस्पिटलमध्ये, येरवड्यातील 60 वर्षीय पुरुषाचा सह्याद्री हॉस्पिटलमध्ये, धायरीतील 53 वर्षीय पुरुषाचा, हिंगणेतील 75 वर्षीय महिलेचा दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये, बुधवार पेठेतील 76 वर्षीय पुरुषाचा पाटील हॉस्पिटलमध्ये, शंकरनगरमधील 73 वर्षीय महिलेचा सह्याद्री हॉस्पिटलमध्ये कोरोनामुळे मृत्यू झाला.

सहकारनगरमधील 61 वर्षीय पुरुषाचा नायडु हॉस्पिटलमध्ये, घोरपडीतील 78 वर्षीय पुरुषाचा AICTS हॉस्पिटलमध्ये, विमाननगरमधील 60 वर्षीय पुरुषाचा जीवन ज्योती हॉस्पिटलमध्ये, बिबवेवाडी 69 वर्षीय पुरुषाचा ताराचंद हॉस्पिटलमध्ये, कात्रजमधील 40 वर्षीय पुरुषाचा दळवी हॉस्पिटलमध्ये, धनकवडीतील 68 वर्षीय पुरुषाचा मोरया हॉस्पिटलमध्ये, सिंहगड रोडवरील 38 वर्षीय पुरुषाचा पुना हॉस्पिटलमध्ये, धानोरीतील 40 वर्षीय पुरुषाचा कस्तुरबा हॉस्पिटलमध्ये, धानोरीतील 75 वर्षीय पुरुषाचा विनोद हॉस्पिटलमध्ये कोरोनामुळे मृत्यू झाला.

धनकवडीतील 91 वर्षीय पुरुषाचा प्लस हॉस्पिटलमध्ये, सोमवार पेठेतील 67 वर्षीय पुरुषाचा सह्याद्री हॉस्पिटलमध्ये, विश्रांतवाडीतील 35 वर्षीय पुरुषाचा, हडपसरमधील 65 वर्षीय पुरुषाचा, कात्रजमधील 65 वर्षीय पुरुषाचा, कोंढवा बुद्रुकमधील 55 वर्षीय महिलेचा, वानवडीतील 61 वर्षीय पुरुषाचा, कात्रजमधील 56 वर्षीय पुरुषाचा, बालेवाडीतील 50 वर्षीय पुरुषाचा, कात्रजमधील 79 वर्षीय पुरुषाचा, कोंढाव्यातील 45 वर्षीय महिलेचा ससून हॉस्पिटलमध्ये कोरोनामुळे मृत्यू झाला.

सदाशिव पेठेतील 71 वर्षीय पुरुषाचा पुना हॉस्पिटलमध्ये, कर्वेरोडवरील 65 वर्षीय महिलेचा सुर्या सह्याद्री हॉस्पिटलमध्ये, हडपसरमधील 46 वर्षीय पुरुषाचा नोबेल हॉस्पिटलमध्ये, हडपसरमधील 53 वर्षीय पुरुषाचा बुधराणी हॉस्पिटलमध्ये, सोमवार पेठेतील 80 वर्षीय पुरुषाचा नोबेल हॉस्पिटलमध्ये, हडपसरमधील 82 वर्षीय पुरुषाचा सिम्बॉयसिस हॉस्पिटलमध्ये, 67 वर्षीय महिलेचा, मॉडेल कॉलनीतील 70 वर्षीय पुरुषाचा कोरोनामुळे मृत्यू झाला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.