Chinchwad News : मोहननगर परिसरातील विजेच्या समस्या सोडवा- शिवसेनेची मागणी

रिडींग न घेता पाठविलेल्या भरमसाठ वीज बिलांमुळे नागरिकांच्या तोंडचे पाणी पळाले आहे.

एमपीसीन्यूज : मोहननगर, काळभोरनगर व रामनगर परिसरामध्ये विद्युत पुरवठा खंडीत होणे, विजेचा दाब कमी जास्त होणे अशा समस्यांनी वीज ग्राहक त्रस्त झाले आहेत. त्यात रिडींग न घेता पाठविलेल्या भरमसाठ वीज बिलांमुळे नागरिकांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. विजेच्या या समस्या तात्काळ सोडविण्याची मागणी शिवसेनेच्या वतीने करण्यात आली आहे.

यासंदर्भात मोहननगर येथील शिवसेना नगरसेविका मीनल यादव आणि शिवसेना विभागप्रमुख विशाल यादव यांनी थरमॅक्स चौकातील महावितरण कार्यालयातील उपकार्यकारी अभियंता उमेश कवडे यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले.

गेल्या अनेक दिवसापासून मोहननगर, काळभोरनगर व रामनगर परिसरामध्ये विद्युत पुरवठा खंडीत होत आहे. तसेच विद्युत दाब कमी जास्त होत आहे. त्यामुळे अनेक विद्युत उपकरणे खराब झाली आहेत. याबाबत महावितरणच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसोबत वारंवार फोनवरून संपर्क साधून सुद्धा ही समस्या कायम आहे. त्यामुळे स्थानिक नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

मोहननगर परिसरातील विद्युत पुरवठा खंडीत होणे, विजेचा दाब कमी- जादा होणे या संशय नित्याच्या झाल्या आहेत. त्या कायमस्वरूपी दूर कराव्यात. त्याचबरोबर मोहननगर परिसरातील अनेक घरगुती वीजबील रीडिंग न घेता अंदाजे देण्यात आले आहे. परिणामी वीज ग्राहकांना आर्थिक भुर्दंड सोसावा लाफ़्ट आहे.

या समस्या स्वतः लक्ष घालून सोडवाव्यात. मोहननगर परिसरातील घरगुती मीटरची पुन्हा रिडींग घेउन वीजबिले दुरुस्त करून द्यावीत, अशी मागणी नगरसेविका यादव यांनी केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.