Maval Corona Update : दिवसभरात 69 नवे रुग्ण तर 90 जणांना डिस्चार्ज

एमपीसी न्यूज – मावळ तालुक्यात रविवारी (दि.23) 69 रुग्णांचा चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला, तर तालुक्यात दिवसभरात 90 जणांना डिस्चार्ज देण्यात आला.

आज शहरी भागात रुग्ण संख्येत वाढ झाली आहे. आज एकही रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला नसुन आतापर्यंत 415 रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. सद्यस्थितीत उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 2297 आहे.

शहरी भागात 38 तर ग्रामीण भागात 31 रुग्ण आज सापडले. आज तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या हद्दीत 19 रुग्ण सापडले. लोणावळा नगरपरिषदेच्या हद्दीत 16 रुग्ण सापडले. वडगाव नगरपंचायतीच्या हद्दीत 3 रुग्ण सापडले.

तालुक्यातील कोरोनाबाधितांची आतापर्यंत ची एकूण संख्या 21,380 झाली आहे. तर दिवसभरात 90 रुग्ण बरे झाल्याने घरी सोडण्यात आले. रविवारी आढळलेल्या कोरोना रुग्णांमध्ये ग्रामीण भागात वराळे 5, साळुंब्रे 5, नवलाख उंब्रे 4, शिवणे 3, इंदोरी 2, निगडे 2, सांगावडे 2, बेबड ओहळ 2, आंबी, तळेगाव दाभाडे ग्रामीण, तुंग, गोडुंब्रे, जांभूळ व पुसाणे प्रत्येकी 1 असे एकूण 31 रुग्ण सापडले.

18,671 जणांना आतापर्यंत डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत 415 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तळेगाव नगरपरिषद हद्दीत सर्वाधिक 7020, लोणावळा नगरपरिषद हद्दीत 3732 व वडगाव नगरपंचायत हद्दीत 1102 रुग्ण सापडले आहेत. शहरी भागात ११,८५४ रुग्ण तर ग्रामीण भागात 9528 रुग्ण आढळून आले आहेत. 1 रुग्णांची परिस्थिती गंभीर आहे.

कोरोना रुग्ण बरे होण्याचा दर 87.32 टक्के आहे तर मृत्यू दर 1.94 टक्के आहे. सद्यस्थिती तळेगाव दाभाडे नगरपरिषद मध्ये 899 लोणावळा नगरपरिषद मध्ये 176 वडगाव नगरपंचायत मध्ये 83 व ग्रामीण भागात 1139 असे एकूण 2297 रुग्ण आहेत. अशी माहिती तहसीलदार मधुसूदन बर्गे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. चंद्रकांत लोहारे व कोविड समन्वयक डॉ. गुणेश बागडे यांनी माहिती दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.