Maval Corona Update: टाकवे येथील नऊ महिन्यांच्या बाळाची अखेर कोरोनावर मात; आतापर्यंत 17 जण कोरोनामुक्त

Maval Corona Update: A nine-month-old baby from Takwe finally overcomes Corona; So far, 17 have been released मावळात 46 टक्के रुग्णांनी जिंकली कोरोनाविरुद्धची लढाई

एमपीसी न्यूज – मावळ तालुक्यात मागील 35 दिवसात आढळलेल्या एकूण 37 रूग्णांपैकी 17 जणांनी कोरोनावर मात करून बरे झाले आहेत. विशेष म्हणजे टाकवे येथील नऊ महिन्यांच्या बाळाने 10 दिवसांची झुंज देत अखेर कोरोना विषाणूला हरविले आहे, अशी माहिती तहसीलदार मधुसूदन बर्गे व तालुका आरोग्याधिकारी डाॅ चंद्रकांत लोहारे यांनी दिली आहे.

काल शनिवार (दि 13) रोजी टाकवे येथील नऊ महिन्यांच्या बाळाने अखेर कोरोनावर मात केली असून त्याला 10 दिवसांच्या उपचारांनंतर रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.

गेल्या 35 दिवसांत तालुक्यातील शहरी भागात 11 तर ग्रामीण भागात 26 असे  37 रूग्ण कोरोनाबाधित झाले असून, यापैकी 17 जण कोरोनावर मात करून बरे झाले आहेत.

बाधित झालेल्या 37 रुग्णांपैकी तळेगाव व माळवाडी येथील दोन कोरोना योद्धा नर्स यापूर्वीच कोरोनामुक्त झाल्या आहेत. 31 मे रोजी अहिरवडे, चांदखेड व घोणशेत येथील तीन रूग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर मुंबईहून नागाथली येथे आलेली 42 वर्षीय व्यक्तीला  (दि 1 जून)  बरे वाटल्याने घरी सोडण्यात आले आहे. 2 जून रोजी चांदखेड येथील 4 व तळेगाव दाभाडे येथील एक रूग्ण, वेहेरगाव एक, खंडाळा येथील दोन, कामशेत येथील एक, टाकवे येथील नऊ महिन्यांच्या बाळासह दोन जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे  सक्रिय रूग्णांची संख्या 20 आहे.

आतापर्यंत 17 रुग्णांनी कोरोनावर मात करून डिस्चार्ज घेतला आहे. त्यामुळे रुग्णांच्या संख्येत घट होत असतानाच दोन दिवसांपूर्वी एकाच दिवशी 12 रुग्णांची वाढ तर काल पुन्हा तळेगाव येथे 4 रूग्णांची वाढ झाल्याने सक्रिय रुग्णांची संख्या पुन्हा वाढल्याचे दिसून येत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.