Maval Corona Update : मावळ तालुक्यात कोरोनाबाधितांनी ओलांडला एक हजारचा टप्पा; शुक्रवारी 50 नवीन रुग्ण

आज आढळलेल्या कोरोना रुग्णांमध्ये 25 रुग्ण शहरी भागातील आहेत. तर 25 रुग्ण ग्रामीण भागातील आहेत. Maval taluka has crossed the one thousand mark of corona patients.

एमपीसी न्यूज – मावळ तालुक्यात कोरोनाबाधितांचा आकडा एक हजारच्या पुढे गेला आहे. आज (शुक्रवारी, दि. 7) कोरोनाचे 50 नवीन रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे कोरोनाबाधितांची एकूण संख्या 1 हजार 29 झाली आहे. तर दिवसभरात 6 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
आज आढळलेल्या कोरोना रुग्णांमध्ये 25 रुग्ण शहरी भागातील आहेत. तर 25 रुग्ण ग्रामीण भागातील आहेत.
ग्रामीण भागात आढळलेल्या रुग्णांमध्ये तळेगाव दाभाडे ग्रामीण येथील आठ, गहूंजे येथील पाच, कामशेत, ब्राह्मणवाडी साते येथील प्रत्येकी दोन, परंदवडी, कडधे, कान्हे, सुदुंबरे, शिरगाव, सुदवडी, देवघर, पारवाडी येथील प्रत्येकी एक रुग्णाचा समावेश आहे.

तळेगाव शहरात 20, लोणावळा शहरात 3 आणि वडगावमध्ये 2 रुग्णांची नोंद झाली आहे.
एकूण 1 हजार 29 रुग्णांमध्ये सध्या 375 रुग्ण सक्रीय आहेत. तर 624 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. 30 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
तळेगाव नगरपरिषद क्षेत्रात 345, लोणावळा नगरपरिषद 94 आणि वडगाव नगरपंचायत क्षेत्रात 68 रुग्ण सापडले आहेत. तर ग्रामीण भागात 522 रुग्ण आढळून आले आहेत.
सध्या रुग्णालयात 303 आणि होम आयसोलेशनमध्ये 72 रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.