Maval : शिवपुण्यतिथी निमित्त रायगडावर दिपवंदना

एमपीसी न्यूज – चैत्र पौर्णिमा, छत्रपती शिवाजी (Maval) महाराजांची पुण्यतिथी निमित्त श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळ व स्थानिक उत्सव समिती महाड यांच्या वतीने दरवर्षी प्रमाणे 343 व्या शिवपुण्यतिथी दिनानिमित्त अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमासाठी मुख्य अतिथी म्हणून राज्याचे सांस्कृतिक मंत्री मंगलप्रभात लोढा उपस्थित होते.

यावेळी लोहगड विसापूर विकास मंचाच्या वतीने शिवसमाधी व जगदीश्वर मंदीर प्रांगणात दिपवंदना करण्यात आली. शेकडो पणत्यांच्या प्रकाशात परिसर उजळून निघाला होता. सर्वत्र भगवे ध्वज उभारण्यात आले होते. त्यामुळे भगवे वातावरण निर्माण झाले होते. कार्यक्रमासाठी मावळ तालुक्यातून असंख्य शिवभक्त महाराजांना अभिवादन करण्यासाठी उपस्थित होते.

Today’s Horoscope 07 April 2023 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

हा कार्यक्रम सचिन टेकवडे संदीप गाडे, महेश सोनपावले, विश्वास दौंडकर, सागर कुंभार, अनिकेत आंबेकर, संदीप भालेकर, अमोल गोरे प्रविण ताम्हणकर, ओंकार मेढी आदी कार्यकर्त्यांनी पार पाडला. “शिवपुण्यतिथी दिनाला रायगडावर महाराजांना अभिवादन करण्यासाठी मंचाचे कार्यकर्ते वर्षानुवर्षे उपस्थित राहतात.

त्यामुळे आम्हाला शिवकार्याची प्रेरणा मिळते. तसेच, 2 जून रोजी तिथीनुसार सुरू होणारे 350 वे शिवराज्याभिषेक शक या कार्यक्रमाचे भव्य आयोजन रायगडावर करण्यात येणार असून त्यामध्ये (Maval) सर्व शिवभक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे” असे आवाहन मंचाचे संस्थापक सचिन टेकवडे यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.