Maval : टाटा धरणात बुडालेल्या पर्यटकाला शोधण्यासाठी दुसऱ्या दिवशी पुन्हा शोधकार्य सुरू

एमपीसी न्यूज – वडेश्र्वर शिंदेवाडी येथील महादेव मंदिरासमोरील ठोकळवाडी (टाटा डॅम) धरणाच्या पाण्यात बुधवारी (दि. 5) सायंकाळी एक तरुण पर्यटक (Maval) बुडाला. त्याची शोध मोहीम गुरुवारी शिवदुर्ग रेस्क्यू टीम लोणावळा आणि वन्यजीव रक्षक मावळ संस्था यांच्या वतीने राबविण्यात आली. दिवसभर शोध घेतल्यानंतरही पर्यटक काचा मृतदेह सापडला नसल्याने शुक्रवारी पुन्हा शोध कार्य सुरू करण्यात आले आहे.

अर्जुन सुभाष माने (वय 25, रा. कोल्हापूर) असे बुडालेल्या पर्यटक तरुणाचे नाव आहे.

Maval : शिवपुण्यतिथी निमित्त रायगडावर दिपवंदना

अर्जुन माने हे कोल्हापूर येथून मावळ तालुक्यात पर्यटनासाठी आले होते. बुधवारी दुपारी ते अंदर मावळ वडेश्वर शिंदे घाटेवाडी येथे पर्यटन करत असताना टाटा धरणात पोहायला गेले. अर्जुन माने आणि त्यांचा मित्र अक्षय कुंभार (रा. कळंब, जि. धाराशिव) धरणात पोहायला उतरले.

त्यावेळी त्यांचे इतर मित्र मितेश विजय राठोड, नयन सिद्धार्थ जाधव, ओम शेखर मराठे, सुरज शिवाजी जगताप, सुशांत सुधाकर धर्माधिकारी हे पाण्याचे किना-यावर उभे होते. पोहत असताना अर्जुन माने अचानक गाळात अडकले गेले आणि बुडाले.

अर्जुन माने यांचा शोध घेण्यासाठी आपदा मित्र मावळ, शिवदुर्ग मित्र लोणावळा, वन्यजीव रक्षक मावळ या संस्थांच्या स्वयंसेवकांना शोध कार्यासाठी गुरुवारी प्रचारण करण्यात आले. दिवसभर शोधकार्य सुरू राहिले.

मात्र अर्जुन माने यांचा मृतदेह सापडला नाही. त्यामुळे शिवदुर्ग रेस्क्यू टीम लोणावळा आणि वन्यजीव रक्षक मावळ संस्था यांच्या माध्यमातून शुक्रवारी देखील शोधकार्य सुरू ठेवण्यात (Maval)आले आहे. वडगाव मावळ पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.