Pimpri News : पिंपरीत नियुक्ती असलेल्या उपायुक्तांचे कामकाज सातारा नगरपरिषदेत

एमपीसी न्यूज  – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या (Pimpri News) आस्थापनेवर  उपायुक्त असलेले अभिजित बापट हे सातारा नगरपरिषदेत मुख्याधिकारी म्हणून मागील 20 महिन्यांपासून  कामकाज करत आहेत. त्यामुळे विविध चर्चेला उधाण आले आहे.

Maval : टाटा धरणात बुडालेल्या पर्यटकाला शोधण्यासाठी दुसऱ्या दिवशी पुन्हा शोधकार्य सुरू

सातारा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी असलेले अभिजीत बापट यांची राज्य सरकारने 18 जून 2021 रोजी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या उपायुक्तपदी प्रतिनियुक्तीने नियुक्ती केली. साता-याच्या जिल्हा प्रशासन अधिका-यांनी  पिंपरीत रुजू होण्यासाठी बापट यांना 12 जुलै 2021 रोजी कार्यमुक्त केले. त्यानुसार तत्कालीन आयुक्त राजेश पाटील यांनी अभिजीत बापट यांना 12 जुलै 2021 रोजी महापालिकेच्या उपायुक्तपदी रुजू करुन घेतले.

बापट हे रुजू होण्यासाठी एक दिवस महापालिकेत आले. त्यानंतर पालिकेत फिरकले नाहीत. त्यातच राज्य सरकारने 15 जुलै 2021 रोजी उपायुक्त असलेल्या बापट यांच्याकडे सातारा नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी या रिक्त पदाचा अतिरिक्त कार्यभार सोपविला. मागील 20 महिन्यांपासून बापट यांची पिंपरी महापालिकेत आस्थापना आहे. मात्र, कामकाज ते साता-यात (Pimpri News) करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.