Hinjawadi : सांगवडे येथील प्राथमिक शाळेला सिनेक्रोन कंपनी तर्फे संगणकाचे वाटप

एमपीसी न्यूज- हिंजवडी येथील नामांकित माहिती (Hinjawadi) तंत्रज्ञान क्षेत्रातील सिनेक्रोन कंपनी यांच्या सीएसआर फंडातून व सरपंच रोहन जगताप यांच्या विशेषप्रयत्नातून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सांगवडे शाळेला संगणक संच कंपनीचे असोसिएट डायरेक्टर रफिक नदाफ,कायदेशीर सल्लागार सैफन सर व तसेचनिवृत्त पोलीसअधिकारी राजेश आगळे सर,मावळ पं.समिती सहाय्यक गटविकास अधिकारी प्रताप पाटील व केंद्रप्रमुख कांबळे सर यांच्या हस्ते भेट देण्यात आला.

दरम्यान सरपंच रोहन जगताप व शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष युवराज राक्षे यांनी व गावातील सर्व पदाधिकारी यांनी आलेल्या सर्व मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले यावेळी कंपनीचे कायदेशीर सल्लागार सैफन मुजावर सर यांनी कंपनीमार्फत सुरू असलेल्या सीएसआर फंडातील कामाबाबतमाहिती दिली वयापुढेही शाळेला व गावाला कंपनीचे विशेष सहकार्य मिळेलअशी माहिती दिली.

त्याच वेळी कंपनीचे प्रशासकीय मॅनेजर राजेश आगळे यांनीकंपनीमार्फत सुरूअसलेल्या संगणक वाटप कार्यक्रमाचा मूळ उद्देश काय आहे.याबाबत माहिती देऊन इंटरनेटच्या युगामध्ये संगणक हा सर्वात महत्त्वाचा घटक आहे या माध्यमातून मुलांना संगणकाचे ज्ञान प्राप्त होऊन भविष्यात माहिती तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये याचा नक्कीच फायदा होईल अशी आशा त्यांनी व्यक्त केली.

Pimpri News : पिंपरीत नियुक्ती असलेल्या उपायुक्तांचे कामकाज सातारा नगरपरिषदेत

त्याचप्रमाणे शाळेला लागणाऱ्या विविध भौतिक गरजांसाठी देखील कंपनी यापुढे नक्कीच सहकार्य करेल अशी माहिती राजेश आगळे यांनी दिली यावेळी सहाय्यक गटविकास अधिकारीपाटील यांनी यांनी प्राथमिक शाळेमध्ये संगणकाचा ज्ञान किती महत्त्वाचे आहे हे अधोरेखित करून मुलांनी जास्तीत जास्त संगणकाचे ज्ञान आत्मसात करून माहिती तंत्रज्ञान या क्षेत्रामध्ये काम करावे अशी भावना प्रकट केली.

यावेळी गावचे सरपंच रोहन जगताप यांनी सुरू केलेल्या उपक्रमांतर्गत सर्व मान्यवरांना भारतीयसंविधानाची उद्देशिका देऊन ग्रामपंचायतीच्या वतीने वतीने आभार मानले .यावेळी शाळेचे मुख्याध्यापक माननीय सपकाळसर यांनी संगणक शाळेला भेट दिल्याबद्दल कंपनीचे आभार मानले.त्यांनीदेखील शाळेमध्ये सुरू असलेल्या डिजिटल शिक्षण बाबतची सर्व माहिती दिली.

यावेळी गावातील ग्रामपंचायत सदस्य मायाताई राक्षे , शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष युवराज राक्षे, उपाध्यक्ष कविता जगताप, साळुंबरे विविध कार्यकारी सोसायटीचे व्हाईस चेअरमन कलावती आमले, संचालक लक्ष्मण चव्हाण,बाळासाहेब राक्षे,अविनाश जगताप तसेच गावातील मान्यवर पोपट राक्षे शिवाजी राक्षे, दत्तात्रय राक्षे,सोपान राक्षे, किसन आमले, संतोष राक्षे, ग्रामसेवक रोहिणी खामकर,कर्मचारी देखील उपस्थित होते.यावेळी सूत्रसंचालन अण्णासाहेब ओहोळ सर यांनी केले व आभार सपकाळ सर (Hinjawadi) यांनी मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.