Pune News : बनावट कागदपत्र वापरून मिळवली जिल्हा परिषद शाळेत नोकरी; शिक्षिकेविरोधात गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – बनावट शैक्षणिक कागदपत्र वापरून जिल्हा परिषद (Pune News) शाळेत नोकरी मिळवणाऱ्या एका महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संगीता दत्तात्रय झुरंगे (रा. लाेणीकंद, नगर रस्ता ता. हवेली) असे गु्न्हा दाखल करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे. लोणीकंद पोलीस ठाण्यात या प्रकरणी तक्रार देण्यात आली आहे. शिक्षणविस्तार अधिकारी किसन भुजबळ (वय 53) यांनी फिर्याद दिली आहे.
याप्रकरणी अधिक माहिती अशी की, संगीता झुरंगे लोणीकंद येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत उपशिक्षिका आहे. त्या अकरावी उत्तीर्ण आहेत. असे असतानाही त्यांनी बनावट कागदपत्रांचा वापर करून जिल्हा परिषद शाळेत नोकरी मिळवली होती. दरम्यान या प्रकाराची तक्रार आल्यानंतर शिक्षण विभागाने या संपूर्ण प्रकरणाची चौकशी केली. यामध्ये संगीता झुरुंगे या दोषी आढळल्या.

 

Hinjawadi : सांगवडे येथील प्राथमिक शाळेला सिनेक्रोन कंपनी तर्फे संगणकाचे वाटप

संगीता झुरंगे यांनी आपल्या बहिणीच्या कागदपत्रांचा वापर केला. बहिणीच्या कागदपत्रावर स्वतःचे नाव लावून त्यांनी डीएड अभ्यासक्रम पूर्ण केला. त्यानंतर त्यांनी जिल्हा परिषद शाळेत उपशिक्षिका म्हणून नोकरी मिळवली. त्यांनी राजपत्रात नावात बदल केला. बनावट शैक्षणिक कागपत्रांचा वापर करुन डीएड अभ्यासक्रम पूर्ण करुन जिल्हा परिषदेच्या शाळेत नोकरी मिळवल्याचे उघडकीस आल्यानंतर त्यांच्या विरुद्ध पोलिसांकडे तक्रार देण्यात आली. लोणीकंद पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास करण्यात (Pune News) येत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.