Maval : जांभूळ गावात स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाची विविध उपक्रमांनी सांगता

एमपीसी न्यूज –  मावळ तालुक्यातील (Maval) जांभूळ गावात स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाची सांगता विविध उपक्रमांनी करण्यात आली. 13 ते 15 ऑगस्ट या तीन दिवसात गावात ध्वजारोहण करण्यात आले. हर घर तिरंगा तसेच माझी माती माझा देश असे उपक्रम राबविण्यात आले. त्याचबरोबर 15 ऑगस्ट रोजी गावातील आजी-माजी सैनिकांचा सन्मान देखील करण्यात आला.

जांभूळ ग्रामपंचायतमध्ये 13 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट सलग तीन दिवस ध्वजारोहण करण्यात आले व हर घर झेंडा उपक्रम राबविण्यात आला.( दि.13) रोजी सकाळी दहा वाजता ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील जांभूळ (Maval) गावचे सुपुत्र सुभेदार मेजर मारुती विठ्ठल गाडे व हवालदार क्लार्क नरेश कुमार त्यागी, शिपाई आनंदा कृष्णा माने, व माजी स्वातंत्र्य सैनिक, मिलिट्री मॅन, पोलीस दल, या माजी सैनिकांना सन्मानचिन्ह, शाल श्रीफळ देऊन त्यांना गौरवण्यात आले व त्यानंतर त्यांनी त्यांचे अनुभव व मनोगत व्यक्त केले.

Lonavala : लोणावळा शहर काँग्रेस व सेवा दलाच्या वतीने रामदास काकडे यांचा सत्कार

लोकनियुक्त आदर्श सरपंच नागेश ओव्हाळ, उपसरपंच एकनाथ गाडे, मा सरपंच संतोष जांभूळकर, सदस्य अमित ओव्हाळ, सदस्या कल्पना काकरे, तृप्ती जांभूळकर, रुपाली गायकवाड, स्नेहल ओव्हाळ, ग्रामसेवक कल्याणी लोखंडे, औटीसर, आशा सेविका रेखा धिडे व गावातील महिला यांच्या हस्ते सन्मान देण्यात आला.

माझी माती माझा देश या उपक्रमात गावातील (Maval) माती एका कलशामध्ये जमा करण्यात आली त्यानंतर माजी सैनिकांच्या हस्ते शिलालेखाचे अनावरण करण्यात आले त्या नंतर वृक्ष लागवड करण्यात आली ह्या कार्यक्रमासाठी ग्रामपंचायत कर्मचारी सर्व शिक्षक वृंद विद्यार्थी महिला व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.