Talegaon Dabhade : स्वा. सावरकर गुरुकुल येथे रोटरी सिटीचा ध्वजारोहण सोहळा

एमपीसी न्यूज – तळेगाव दाभाडे येथील (Talegaon Dabhade) स्वातंत्र्यवीर सावरकर गुरुकुलच्या प्रांगणात रोटरी क्लब ऑफ तळेगाव सिटीतर्फे अध्यक्ष सुरेश शेंडे यांच्या हस्ते ध्वजारोहण सोहळा संपन्न झाला. 242 बटालियनचे असिस्टंट कमांडेंट श्रीकृष्ण घुले प्रमुख पाहुणे म्हणून होते.

ध्वजारोहण कार्यक्रमासाठी (Talegaon Dabhade) विलास काळोखे, किरण ओसवाल, भगवान शिंदे, दीपक फल्ले, सुरेश धोत्रे, संजय मेहता, दादासाहेब उ-हे, शशिकांत हळदे, दिलीप पारेख, संतोष शेळके, प्रदीप टेकवडे, प्रशांत ताये, सुनील महाजन, राजेंद्र कडलग, डॉ.गणपत जाधव, संतोष परदेशी,विश्वास कदम, रघुनाथ कश्यप,आनंद पूर्णपात्रे, निखिल महापात्रा, संतोष सातकर, प्रसाद पादिर, प्रदीप मुंगसे, मनोज नायडू, डॉ. धनश्री काळे,संगीता शिरसाट, मनोज राठोड, रामनाथ कलावडे,तानाजी मराठे,नितीन शहा,राकेश गरुड इ. सदस्य व गुरूकुलचे व्यवस्थापक दादासाहेब शिरोडकर, संचालक हिंमतभाई पुरोहित,संजय जाधव,कैलास भेगडे,बाळू नाटे व तळेगाव येथील स्वामी विवेकानंद योगा ग्रुपचे सदस्य, विद्यार्थी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

विद्यार्थ्यांनी खूप अभ्यास करून या देशाचे भवितव्य घडवण्यासाठी योगदान द्यावे,आजचे विद्यार्थी उद्याचे देशाचे उज्वल भविष्य आहे हे नमूद करताना विद्यार्थ्यांना व नागरिकांना शुभ संदेश अध्यक्ष सुरेश शेंडे यांनी आपल्या मनोगताद्वारे दिला.

Maval : जांभूळ गावात स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाची विविध उपक्रमांनी सांगता

या प्रसंगी इंटरनॅशनल आयर्न मॅन स्पर्धेत 226 कि.मी. अंतर 13 तास आणि 46 मिनिटात पार करून विक्रमी कामगिरी करणारे श्री विशाल चंद्रकांत शेटे यांचा रोटरी सिटीच्या वतीने अध्यक्ष सुरेश शेंडे, संस्थापक अध्यक्ष विलास काळोखे,ट्रेनर दिलीप पारेख व 242 बटालियन सी.आर.पी.एफ.चे असिस्टंट कमांडंट श्रीकृष्ण घुले यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

प्रशांत ताये यांनी विशाल शेटे यांचा समर्पक शब्दांत परिचय करून दिला. चिकाटी,मेहनत, जिद्द व ध्येय यांच्या बळावर यश खेचून आणता येते हे सत्काराला उत्तर देताना विशाल शेटे यांनी मनोगताद्वारे विशद केले व स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुरेश दाभाडे यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.