Talegaon Dabhade News: तळेगाव दाभाडे परिसरातील विविध शाळा-महाविद्यालयांत स्वातंत्र्यदिन साजरा

Independence Day celebrations in various schools in Talegaon Dabhade area

एमपीसी न्यूज- रिमझिम पावसाच्या सरी झेलत तळेगाव शहर परिसरात स्वातंत्र्यदिन उत्साहाच्या वातावरणात साजरा करण्यात आला. येथील नगरपरिषद कार्यालयावर नगराध्यक्षा चित्रा जगनाडे यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले.

यावेळी उपनगराध्यक्षा वैशाली दाभाडे, संत तुकाराम साखर कारखान्याचे उपाध्यक्ष बापूसाहेब भेगडे, सत्तारूढ पक्षाचे गटनेते अमोल शेटे, विरोधी पक्षनेते गणेश काकडे, माजी नगराध्यक्ष राजेंद्र जांभुळकर, मुख्याधिकारी दीपक झिंजाड यांच्यासह विविध खात्याचे अधिकारी, आजी माजी नगरसेवक उपस्थित होते. यावेळी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य खात्यात विशेष काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

इंद्रायणी महाविद्यालयात माजी राज्यमंत्री संजय भेगडे यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. यावेळी पुणे जिल्हा भाजपचे अध्यक्ष गणेश भेगडे, संस्थेचे कार्यवाह रामदास काकडे, खजिनदार चंद्रकांत शेटे, संचालक शैलेश शाह, संजय वाडेकर, प्राचार्य डॉ. संभाजी मलघे, डॉ. बी.बी.जैन, जी एस. शिंदे, उपप्राचार्य ए. आर. जाधव आदी उपस्थित होते.

तळेगाव विद्या प्रतिष्ठान संचलित कृष्णराव भेगडे इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये संस्थेचे संस्थापक चंद्रकांत काकडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष संदीप काकडे, खजिनदार गौरी काकडे, सुभाष दाभाडे, दीपक जाधव, मुख्याध्यापिका मीना अय्यर आदी उपस्थित होते. संदीप काकडे यांनी स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या. कांचन पेठकर यांनी सूत्रसंचालन केले. श्रावणी देसाई यांनी आभार मानले.

दहावीत प्रथम आलेल्या विद्यार्थीनीच्या हस्ते ध्वजवंदन

इयत्ता दहावीच्या परीक्षेत विद्यालयात प्रथम आलेली विद्यार्थिनी ऋतुजा ढवळे हिच्या हस्ते जैन इंग्लिश स्कूल येथे ध्वजारोहण करण्यात आले. विद्यालयाची ही परंपरा आहे. यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष प्रकाश ओसवाल, संचालक रणजित ओसवाल, राकेश ओसवाल, मुख्याध्यापिका विजया शिंदे, अपूर्वा टकले, शुभांगी भोईर उपस्थित होते.

सह्याद्री इंग्लिश स्कूल येथे विद्यालयात दहावीच्या परीक्षेत प्रथम आलेली विद्यार्थिनी सुप्रिया पांडे हिच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी माजी राज्यमंत्री बाळा भेगडे, संस्थेचे संस्थापक गणेश भेगडे, अध्यक्ष सुनील भेगडे, सचिव दत्तात्रय नाटक, खजिनदार राहुल गोळे, संचालक विलास भेगडे, मुख्याध्यापिका वैशाली बोन्द्रे आदी उपस्थित होते.

स्वामी विवेकानंद इंग्लिश स्कूल येथे रोटरी क्लब ऑफ तळेगाव एमआयडीसीच्या अध्यक्षा रजनीगंधा खांडगे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी संस्थापक अध्यक्ष संतोष खांडगे, उपाध्यक्ष दादासाहेब उ-हे, सचिन कोळवणकर, पर्यवेक्षिका वेणू शर्मा आदी उपस्थित होते.

तळेगाव जनरल हॉस्पिटल येथे संस्थेचे विश्वस्त चंद्रभान खळदे यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. यावेळी डॉ. अशोक निकम, शैलेश शाह, डॉ.दिलीप भोगे, डॉ. संजीव कडलासकर आदी उपस्थित होते.

कांतीलाल शाह विद्यालयात तळेगाव लायन्स क्लबच्या अध्यक्षा प्रमिला वाळुंज, क्रांती वाळुंज, शाळेचे अध्यक्ष शैलेश शाह, महेश शाह, मुख्याध्यापिका सुमन रावत, वैशाली शिंदे यांच्या उपस्थितीत ध्वजारोहण करण्यात आले.

मामासाहेब खांडगे नागरी सहकारी पतसंस्थेचे सचिव विनायक कदम यांच्या हस्ते मामासाहेब खांडगे इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये ध्वजारोहण झाले. यावेळी मुख्याध्यापिका प्रणाली गुरव आणि शिक्षक उपस्थित होते.

रोटरी क्लब ऑफ तळेगाव सिटीचे अध्यक्ष संतोष शेळके यांच्या हस्ते सेवाधाम वाचनालय येथे ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी पदाधिकारी आणि सदस्य उपस्थित होते.

बालविकास विद्यालय येथे संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत शेटे यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. यावेळी सचिव किशोर राजस आणि पदाधिकारी उपस्थित होते.

तळेगाव दाभाडे शहर भाजपच्या कार्यालयावर अध्यक्ष रवींद्र माने यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. यावेळी माजी राज्यमंत्री संजय भेगडे, जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे, नगराध्यक्षा चित्रा जगनाडे, कार्याध्यक्ष महेंद्र पळसे आदी उपस्थित होते. सतीश राऊत यांनी सूत्रसंचालन केले.

रामभाऊ परूळेकर विद्यानिकेतन येथे अध्यापक डॉ. संकेत पोंक्षे यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले.यावेळी विश्वस्त नंदन रेगे, मुख्याध्यापिका प्रतिभा चौधरी, पर्यवेक्षक एल.डी.कांबळे, शरद इसकांडे उपस्थित होते. संकेत पोंक्षे यांनी डॉक्टरेट पदवी मिळविल्याबद्दल नंदन रेगे यांच्या हस्ते त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.